महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी १०७
करण्यासाठी आम्हीं जो पूर्वपक्ष व उत्तरपक्ष केला आहे तो बिनचूक आहे असें आम्हास वाटतें. या वादाचा निकाल कसा करावा यासाठी मद्रास हायकोर्टाच्या एका निकालाचा आम्ही आधार घेत आहोंत. त्याचें कारण पुढे कळेल. त्या दाव्यात (६ मद्रास २०३) वादी प्रतिवादी हिंदु मुसलमान होते. व वादाचा मुद्दा मशिदीपुढे वाद्ये वाजविणें किंवा न वाजविणें या संबंधीचा होता. त्या दाव्यांत खालील Forges हिंदु लोकांना मशिदीपुढें वाद्यें बंद ठेवण्याचा हुकूम केला होता
व त्याचें समर्थन करतांना जीं कारणें त्यानें दिलीं होतीं, त्यांत एक महत्वाचें कारण
असें होतें की, मशिदीपुढें कोणीही वाद्यें वाजवूं नयेत ही वहिवाट इतकी जुनी आहे कीं, तिच्या फारादिवसाच्या अस्तित्वावरून आतां तो मुसलमानांचा विशिष्ट हक्क झाला आहे. आणि तो त्यांचा हक्क शाबूद राखण्यासाठी हिंदूंना मनाई करणें गैर होणार नाही. त्यांत त्यानें असेंही म्हटलें होतें कीं, सार्वजनिक सोयींचा उपयोग कोणत्यारितीने करण्यांत यावा याचा निकाल देतांना जातीजातींतील व धर्माधर्मांतील परस्पर मनोभावनांचा व रूढींचा विचार करणें प्राप्त आहे. यावरून असें दिसून येईल कीं, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात जो वादाच्या निर्णयाचा मुद्दा _ वर दिला आहे तोच या हिंदु मुसलमानांच्या दाव्यांतील मुद्दा होता, व म्हणूनच त्याचा आधार आम्हीं घेतला आहे. अर्थात् या दाव्यांत जी विचारसरणी हायकोर्टाकडून मांडण्यात आली तीच विचारसरणी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यातील मुद्यास लागूं पडेल यास वानवा नाहीं. हिंदु मुसलमानांच्या या दाव्यात खालच्या Forged जी विचारसरणी मांडली होती त्यास उत्तर देतांना मद्रास हायकोर्टाचे चीफ जस्टिस न्यायमूर्ती टर्नर यांनीं जें विवेचन केलें आहे तें इतके समर्पक आहे कीं, तें वाचून वरील मुद्याचा फोलकटपणा सहज लक्षांत येतो. न्यायमूर्ती म्हणतात, ' माझ्या समजुतीप्रमाणें अशा प्रकारचे जातिविशिष्ट हक्क प्रस्थापित करण्यास रूढीचा आधार यापूर्वी कोर्टात केव्हांच सांगण्यात आलेला नव्हता. मद्रास इलाखा केव्हांही सर्वस्वी मुसलमानांच्या हस्तगत झाला नसल्याकारणाने तशा प्रकारची (मशिदीपुढें वाद्यें बंद करण्याची) रूढी सर्वत्र प्रस्थापित झाली असेल असें मानणें निराधार होईल. एवढें असूं शकेल की, ज्या ज्या प्रांतीं मुसलमानांचे वर्चस्व होतें त्या त्या प्रांती मुसलमान लोकांनी राज्यकर्ते म्हणून आपल्या धर्मातील विशिष्ट प्रकारच्या आचारास व रूढीस हिंदुसारख्या पराजित लोकांस मान्य करावयास लाविलें असेल. या बाबतींत मला जें सांगावयाचें आहे तें हें की, अशा प्रकारचे विशिष्ट हक्क जे केवळ धर्माच्या व जातीच्या रूढीच्या बलावर मागण्यांत येतात ह्या हक्कांचा उगम अशा काळी झाला होता की, त्याकाळी राज्यकर्ते आपल्या धर्मास कायद्याचें स्वरूप देण्यास मागें पुढें पहात नसत. पण सर्वांना समान हक्क व धर्माच्या बाबतींत तटस्थपणा या ज्या दोन महत्वाच्या तत्त्वावर ब्रिटीश अमदानी