महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी - Page 152

१०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उभारली गेली आहे त्या तत्वाशी वरील प्रकारची रूढी अगदी विसंगत आहे. सार्वजनिक रस्त्यावरून एका जातीस जाण्यास दुसऱ्या जातीने प्रतिबंध केला तर ती गोष्ट ब्रिटीश अमदानीत केव्हांही खपली जाणार नाही. मलबार येथील पारिया लोकांस कोर्टांत येण्यास कोणीही मज्जाव करीत नाही याचेंही कारण हेंच आहे. हा शिरस्ता नवा आहे ; परंतु ज्या तत्वाच्या पायावर ब्रिटीश अमदानी उभारली गेली आहे त्या तत्वामुळें जुन्या रूढीचे उच्चाटण झालें आहे हेंही पण तितकेंच खरें आहे. बेबंदशाही बंद होऊन कायदेशीर राज्यपद्धती अमलांत येते तेव्हां अशाप्रकारचे फेरबदल अमलांत येतात. व ते फेरबदल विचारी लोकांस कबूल होण्यासारखे असले पाहिजेत हेंही खरें आहे. परंतु एका पंथाच्या लोकांच्या दुराग्रहास वश होऊन कायदा बाजूस सारतां येत नाही हेंही ह्या बरोबर लक्षात ठेविलें पाहिजे. आणि यदा कदाचित जुन्या रूढीच्या अबाधितपणामुळें एकदा हक्क निर्माण झाला आहे असें जरी सिद्ध झाले तरी तो हक्क न्यायाच्या दरबारांत मान्य होण्यापूर्वी ज्या रूढीच्या आधारावर त्याची उभारणी झालेली आहे ती रूढी वाजवी आहे किंवा गैरवाजवी आहे हें निश्‍चित झालें पाहिजे. म्हणून एकादा मनुष्य आपले सार्वजनिक बाबतीतील जन्मजात हक्क उपभोगांत आणीत असतां दुसरा त्यास रूढीचा आधार देऊन प्रतिबंध करण्याचा आपणांस हक्क आहे असें म्हणूं लागला तर त्याचें म्हणणें ग्राह्य आहे

fea अग्राह्य आहे हें त्यानें आधार दिलेल्या रूढीच्या योग्यायोग्यतेवर सर्वस्वी

अवलंबून राहील. “ वरील मार्मिक विवेचनावरून एवढें सिद्ध होत आहे कीं, रूढींने हक्क प्राप्त होतात हें म्हणणें सर्वथैव खोटें आहे असें जरी म्हणतां यावयाचें नाही तरी केवळ बहुता दिवसांच्या रूढीने नेहमींच हक्क प्राप्त होतात हें म्हणणेंही सर्वथैव खरें नाही. रूढीनें हक्क प्राप्त होतात की होत नाहीत हें सर्वस्वी रूढीच्या कायदेशीरपणावर अवलंबून आहे. वरील विवेचन स्पृश्य व अस्पृश्य जातीतील वादास लागूं केलें तर वादाच्या निर्णयात जो मुद्दा निर्माण होतो तो हाच की, अस्पृश्यतेची रूढी कायद्यास संमत आहे काय ? जे लोक ती कायदेशीर आहे असें म्हणतात त्यांना न्यायकोर्टानी वेळोवेळी दिलेल्या निकालांची माहिती नसावी हें उघड आहे. आज ज्याप्रमाणें स्पृश्य लोक आज अस्पृश्य लोकांस पाणवठे व देवळें यावर प्रवेश करण्यास बंदी करतात त्याप्रमाणें पूर्वी एके काळी याच रूढीच्या आधारावर स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांस रस्त्यावरून फिरण्यासही मनाई करण्याचा आपणांस हक्क आहे असें म्हणत असत परंतु न्यायकोर्टानेंही रूढी बेकायदेशीर आहे असें ठरवून त्यांचें म्हणणें नाकबूल केलें. कांही वर्षापूर्वी मद्रास इलाख्यांत तिनीवेल्ली येथे अस्पृश्य लोकांना Ud घेऊन अमूक एका रस्त्यानें स्मशानभूमीकडे नेतांना स्पृश्य हिंदु कडूंन हरकत करण्यांत आली होती. परंतु