ब्राह्मणेतरांना अस्पृश्यांचे शत्रु दाखवून ब्राह्मणांना अस्पृश्य मित्र गणतील हा समज चुकीचा - Page 162

२६
शत्रु दाखवून ब्राह्मणेतरांना अस्पृश्यांचे
ब्राह्मणांना अस्पृश्य मित्र गणतील हा समज चुकीचा

हिंदूंच्या तरणोपायाची जशी स्वामी श्रद्धानंदजी सारख्या महात्म्यांना अहर्निश चिंता पडली आहे तशी ब्राह्मणांच्या तरणोपायाची नेहमी चिंता वाहाणारे लोक आहेत आणि म्हणूनच हिंदू संघटनेबरोबर ब्राह्मण संघटना चालू आहे. या महाराष्ट्रांतील ब्राह्मण संघटनेचें अध्वर्यु पुण्याचे रा. माटे हे आहेत. ब्रह्मवृंदांच्या वाटेतील कांटे जाऊन त्यांचा कारभार सुखाचा होवो एवढीच काय ती त्यांची इच्छा ! व त्यासाठी महार हाती सांपडले नाहीत तरी चांभार, मांगांना हाती धरण्यास ते कचरत नाहींत. उलट अशा कामीं ते तत्पर असतात. कारण अशा मसलतीनें ब्राह्मणांना अस्पृश्यांचा आधार मिळतो व ब्राह्मणेतरांपेक्षां ब्राह्मणवर्ग अस्पृश्यता निवारण्याचें कामीं जास्त उपयोगी पडतो, अशी फुशारकी मारावयास सांपडते. ' एक पंथ दो काज ' हा माट्यांचा हेतु नसून ' दो पंथ एक काज ' हाच त्यांचा खरा हेतु आहे, हें आम्हांस ठाऊक आहे. तसें जर नसतें तर अस्पृश्यता निवारकवाल्या माट्यांनीं महाडला जाऊन जो खटाटोप केला तो कशाला केला असता ? तो कांहीं अस्पृश्यांचा कैवार घेऊन किंवा त्यांची बाजू मांडावी म्हणून केलेला नाहीं हें उघड आहे. फक्त अस्पृश्यांनी शेटजी भटजींवर केलेले आरोप वृथा आहेत हैं त्यांना दाखवावयाचे होतें. ही भावना रा. माटे यांच्या

मनांत नसती तर त्यांनी महाडची वाट धरिली असती किंवा नाहीं याबद्दल आम्हांस

शंका आहे. कसेंही असो. मोठ्या कष्टानें मिळविलेली माहिती रा. माटे यांनी

बुधवार, ता. ४ मे रोजी पुणें येथें शिवाजी मंदिरांत व्याख्यानरुपानें निवेदन

केली. महाड येथील घडलेल्या प्रकाराच्या खरेखोटेपणाबद्दल आम्हांस जें कांहीं सांगावयाचें होतें तें सर्व आम्हीं सांगून टाकल्यामुळे माटे व दाते यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीसंबंधी लिहिण्याची आम्हांस कांहीं गरज भासत नाहीं. आम्हांस इतकेच सांगावेसे वाटतें कीं, शेटजीभटजींनी मारामारीत भाग घेतला नाहीं असें जें माटे व दाते. यांनी जाहीर केलें आहे तें साफ खोटें आहे. जी गोष्ट आम्हीं स्वतः डोळ्यांनी पाहिली तिच्या खरेपणाविरुद्ध कोणी कांहीही सांगितलें तरी त्या बाबतीतील आमचें मत कधींही बदलणार नाही. ब्राह्मणांनी मारामारींत भाग