MARIN अस्पृश्यांचे शत्रु . . . . . गणतील हा समज चुकीचा १२१
मूकनायकांत जर असा भेटी परतभेटीचा संबंध ठेवला तर तो मांगाला ब्राह्मणाने . आपली मुलगी दिल्यानें घडणाऱ्या प्रतिलोम संबंधाप्रमाणें कमीपणाचा होणार ! यांची योग्यता ती काय, यांना परत भेट देऊन यांचे आमचें नसतें नातें जोडून घ्यावयाचे काय म्हणून, वगैरे वगैरे अहंभावनेनें पछाडल्यामुळें केसरी परत भेटीला आला नाही. जुनी गोष्ट कशाला ? आम्ही ' बहिष्कृत भारत ' सुरू केल्यापासून आमच्या पत्राचे अंक नियमितपणे आम्ही केसरीकडे व्यवसाय बंधू या नात्यानें पाठवित असतों. पण आमच्या सौजन्याची फेड म्हणून गेल्या केसरीच्या अंकांत कोणासही न दिसेल अशा एका कोन्याकोपऱ्यांत पोच तेवढी दिली आहे. पुन्हां अभिप्राय नाही तो नाहींच ! जेथे वाटेल त्या खरकट्या मरकट्या पत्रावर अगर नासक्या BIRT जिनसांवर अभिप्राय देण्याचा केसरीचा प्रघात आहे तेथें बहिष्कृत भारतावर अभिप्राय देऊ नये यांत केसरीचा दिमाख नाही तर काय आहे. पण केसरीचा हा दिमाख फार दिवस चालावयाचा नाही. घमेंड जिरण्याची वेळ आतां
जवळ येऊन ठेपली आहे. तसें जर नसतें तर केसरी परत भेटीला कां आला
असता अगर त्याला महाडच्या पाणी प्रकरणाच्या बाबतींत कां वाचा फुटली असती ?
* हत्ती चलता है कुत्ता भुकता है ' असा चढेलपणा ठेवून इतःपर चालावयाचें नाहीं, म्हणून तर तारीख ३/५/१९२७ च्या अंकांत केसरीनें आपल्या स्फूट सुचनांत महाडच्या पाणी प्रकरणावर आपले विचार प्रगट केले आहेत. अस्पृश्यता निवारक मंडळाच्या माटे मास्तरांनी व हिंदु महासभेच्या दात्यांनी चवकशी करून जी माहिती केसरीला पुरविली तीवरून केसरी म्हणतो कीं, मारामारीत ब्राह्मणेतरांनीच भाग घेतला होता. शेटजीमटजीनी मारामारीत भाग तर घेतला नाहींच, पण अस्पृश्यांना सभेच्या कामी तसेंच मारामारीनंतर मदतच केली. यास्तव शेटजीभटजींना शिव्याशाप देणाऱ्यां अस्पृश्यांनी आपली दिशाभूल होऊं देऊं नये, असा केसरीचा पोक्तपणाचा सल्ला आहे. शेटजीभटजींना जबाबदार धरण्यांत आम्ही दिशा भूल करीत आहोंत असें आम्हांस मुळींच वाटत नाहीं. परंतु शेटजीभटजींनी मारामारीत भाग घेतला नसून फक्त ब्राह्मणेतरांनीच भाग घेतला होता हें खोटें विधान जरी खरें मानलें तरी त्याबद्दल केसरीनें काय सांगतिलें आहे? ब्राह्मणेतरांची कान-उघाडणी केली आहे किंवा अस्पृश्यतानिवारणार्थ एकादा उपाय सुचविला आहे ? मुळींच नाहीं. एवढ्या मोठ्या प्रश्नावर लिहितांना केसरीसारख्या पत्रांनें लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालावयास पाहिजे होतें. बदललेल्या ada आपण कसें वागले पाहिजे याचा खुलासा करून अज्ञ जनतेची समजूत करून द्यावयास पाहिजे होती. पण त्यांच्या लिहिण्यात