१२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
उदार कल्पनेची कोठें छटाही दिसत नाहीं. उलट त्यांनें जें लिहिलें आहें ते अगदी कोत्या बुद्धीचें निदर्शक आहे. त्यांत शेटजी भटजींची वकिली करण्याचा क्षुद्र हेतु आहे, इतकेंच नव्हे तर शुद्ध आगलावेपणा आहे. असें कां, याचा तपास केला असतां असें दिसून येईल कीं, अस्पृश्यतानिवारण्याचे बाबतींत साऊथ आफिकेतील गोऱ्या लोकांना अस्पृश्यतानिवारणाची जितकी कळकळ आहे त्याहून जास्त कळकळ केसरीला नाहीं. दोघानांहि अस्पृश्यता घालवावयास नको. उलट आपल्या स्वार्थी धोरणाला एक कारण म्हणून तिची होईल तितकी जोपासना करण्याकडे यांचें लक्ष ! हिंदी लोकांनीं समान हक्क मागितले कीं, साऊथ आफिकेंतील गोऱ्या लोकांनीं अस्पृश्यतेच्या अन्यायाचे घोडें दामटलेंच ! तसेंच ब्ह्मणेतरांनीं ब्राह्मणांशी समान हक्क मागितले कीं, केसरीनें तुम्हीं अस्पृश्यांना विरोध करतां मग तुम्हाला आमच्या बरोबरीने हक्क मागण्याचा काय अधिकार असा प्रश्न केलाच. !
ब्राह्मणेतरांच्या सबबीवर केसरी कंपुंतील लोकांस अस्पृश्यता निवारण्याचे बाबतीत आपले कर्तव्य टाळण्यास कसा सोपा मंत्र सांपडला आहे हे अनुभवसिद्ध आहे. दिवेकर शास्त्र्यांसारखे लोक सांगतात की, अस्पृश्यांना देवळात व पाणवठ्यावर घ्यावयास आम्हां ब्राह्मणांस कांही हरकत नाही. पण ब्राह्मणेतर लोकांना तें खपत नाही. हिंदुसमाजांस लोकसंग्रह व्हावा म्हणून तर अस्पृश्यांना जवळ करावयाचें. पण त्यांच्यासारख्या अल्पसंख्यांक लोकांना जवळ केल्यानें ब्राह्मणेतरांसारखे बहुसंख्यांक लोक फुटून हिंदुसमाजाच्या बाहेर जातील ! मग आम्हीं अस्पृश्यांना जवळ करून काय करावें ? केसरी म्हणतो आम्ही जवळ करावयास तयार आहोंत. तुमचे शत्रू आहेत ते ब्राह्मणेतर. त्यांच्याशी तुम्ही जें भांडण भांडावयाचें तें भांडा. आम्हाला काय सांगतां ?
ब्राह्मणेतरांचे हे केवळ FATA आहे. ज्याला कांहीं करावयाचें नाही तो हैं पुढें करतोच. पण ज्यांच्या मनांत करावयाचें आहे त्यांना ते आड येत नाहींत याबद्दल आमची खातरी आहे. हें नुकतेंच बदलापूर येथे झालेल्या शिवजयंतीच्या वेळी एका साध्या भिक्षुकाने सिद्ध करून दिलें आहे. बदलापूर येथें हिंदु
५ बदलापूर जि. ठाणे येथे दि. ३ मे १९२७ ला त्रिशत सांवत्सरिक श्रीशिवाजी उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. शिवाजी महाराजांच्या आंगच्या निरनिराळ्या गुणावर बाबासाहेबांनी अत्यंत परिणामकारक एक तासभर भाषण केले. शेवटी ते म्हणाले, “ ज्या शिवाजीने आपल्या लोकोत्तर गुणाने राज्य मिळविले ते त्यांचे राज्य चिरकाल का टिकले नाही याचे कारण हेच की, त्या राज्याचा अभिमान सर्वांना सारखाच नव्हता. एक राजा गेला व त्या ठिकाणी दुसरा राजा आला तरी लोकांच्या नित्याच्या व्यवहारात काहीच फरक होत नसे.-पाहा, खंड १८, भाग-१, भाषण क्रमांक-८ पृ.५१-५२.