ब्राह्मणेतरांना अस्पृश्यांचे शत्रु . .... गणतील हा समज चुकीचा १२३
मुसलमानांत तेढ उत्पन्न झालेली आहे हें सर्वश्रुत आहेच. तेव्हा तेथील हिंदु समाजांत संघटना होऊन स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद नाहीसा व्हावा यास्तव हा उत्सव मुद्दाम डॉ. आंबेडकरांचे अध्यक्षतेखाली घडवून आणावा, असा स्थानिक हिंदु पुढाऱ्यांनी निश्चय केला, व ही कामगिरी बदलापूरचे पालयेशास्त्री यांजवर सोंपविण्यांत आली. परंतु डॉ. आंबेडकरांची उतरण्याची सोय कोठें करावी हा एक त्यांतला मोठा अडचणीचा प्रश्न होता. त्याची जबाबदारी आपण घेऊं म्हणून बदलापूर येथील एका प्रमुख गृहस्थानें आश्वासन दिलें होतें असें म्हणतात. पण शेवटी पालये शास्त्री यांजवरच ती जबाबदारी येऊन पडली. ती जबाबदारी पार पाडतांना पालये शास्त्री यांनी जे धैर्य दाखविलें तें वाखाणण्यासारखें आहे. डॉक्टर आंबेडकरांना आपल्या घरी पाहुणे म्हणून ठेवून घेतल्याने आपल्या भिक्षुकीच्या धंद्यावर काय परिणाम होईल याचा त्यांना पूर्ण अंदाज होता. शिवाय आपले प्रतिस्पर्धी चित्पावन भिक्षुक ब्राह्मणेतरासारख्या अडाणी यजमानांस तुमचा भिक्षुक भ्रष्ट झाला असें सांगून फितुर करण्यास मागें पुढें पाहणार नाहीत हें ते जाणून होतेच. तेव्हां त्यांनी आपल्या दहा वीस गांवच्या यजमानास बोलाविलें व त्यांच्यापुढे आंबेडकरांचे मी आपल्या घरी आदरातिथ्य केल्यास तुम्हांला कांही हरकत आहे का ? असा प्रश्न मांडला. त्यावर जमलेल्या सर्व ब्राह्मणेतरांनी ““ तुम्ही तिकडे आम्ही ; तुम्हांला हरकत नाहीं तर आम्हांलाहि नाही. “ असें उत्तर दिलें. अशापरी आपल्या अधिकाराचा उपयोग करून एका कर्मठ ब्राह्मणाने अस्पृश्यांबरोबर आपल्या घरी सहभोजन केले व या कामीं ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांची समजूत केली तर ब्राह्मणेतर आड येत नाहींत असें सिद्ध करून दिलें.
केसरीपुढें या बिचाऱ्या भिक्षुकाची कांहीच मातब्बरी नाही. केसरी हैं एक महाराष्ट्रांतले नाणावलेलें पत्र आहे. हल्ली जरी तें खालावलेले आहे तरी ' हिंग गेला पण वास राहिला ' या म्हणीप्रमाणे त्याचें नांव अजून आहे. व बरेचसे लोक आपलें धोरण व आपली मतें केसरीच्या धोरणावरून व मतांवरून ठरवितात. अर्थात केसरीने जर जोराने उपदेश केला तर जसा पालये शास्त्र्यांसारख्या भिक्षुकांनी त्यांच्या अंकित असलेल्या ब्राह्मणेतर जनतेला योग्य
वळण लावण्याचा प्रयत्न केला तसा प्रयत्न इतर भिक्षुकही करतील याबद्दल
आम्हांस बिलकूल संशय नाही. जी गोष्ट एका साध्या भिक्षुकाने करून दांखविली ती करा म्हणून सांगायचे धर्य केसरींत कोठे आहे [! ] [छुं ] [म्हणून ] [अंगावर ] कुत्रा सोडणारा अगर सुटला असतां त्यास आवरून न धरणारा [कुत्र्याचा ] धनी [दोषी ] ठरत नाही, कुत्राच दोषी ठरतो हे केसरींचें सांगणे अगदी हास्यास्पद
आहे. प्रसंग विशेषीं आम्ही ब्राह्मणेतरांविरुद्ध लिहितों [म्हणून ] [ब्राह्मणेतरांत ]