१२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ब्राह्मण्याची ज्योत प्रज्वलित करण्याची जबाबदारी कोणावर आहे याबद्दल आमच्या मनांत शंका आहे असें मात्र कोणी मानूं नये. अस्पृश्य व ब्राह्मणेतर यांच्यात दुही व फूट पडली असतां आपल्या अधिकाराचा सदुपयोग करून तो मिटविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ब्राह्मणेतर तुमचे शत्रु आहेत येवढेंच दाखवून देण्यापुरते श्रम घेणाऱ्या ब्राह्मण लोकांना अस्पृश्य लोक आपले मित्र म्हणून गणतील असा समज करून घेणे चुकीचें आहे.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत ता. २० मे १९२७.