महारांनी सर्व अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्या रक्ताचे सिचन केले - Page 169

२७
महारांनी सर्व अस्पश्यांचे हक्क प्रस्थापित
करण्यासाठी आपल्या रक्ताचे सिंचन केले

ब्राह्मण अस्पृश्यांना जवळ करावयास तयार आहेत. तुमचे शत्रु आहेत ते ब्राह्मणेतर असे ठरविण्याचा केसरीने जो प्रयत्न चालविला तसाच प्रयत्न मांग जातीचेही पुढारी करीत असल्याचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर खालीलप्रमाणे प्रदर्शित केले आहेत--संपादक.

अपवाद म्हणून एका माणसाचा उल्लेख करणें भाग आहे. अस्पृश्य समाजांतील मांग जातीचे पुढारी रा. सकट यांचे धोरण बाकीच्या अस्पृश्य जातीच्या पुढान्यांह्न नेहमीच भिन्न असतें. याचें कारण अगदी उघड आहे. बाकीचे अस्पृश्य पुढारी आपली मतें आपणच बनवितात. पण रा. सकट यांची मतें माटे मास्तर यांजकडून तयार होऊन येतात. ब्राह्मणांत अस्पृश्यता निवारणाची सोंगें घेऊन मिरविणाऱ्या लोकांपैकी माटे मास्तर हे एक आहेत. रा. सकटांची मतें माट्यांच्या मुशीतून ओतली गेली असल्यामुळें त्यांना सहजी ब्राह्मणी ठेवण येते. म्हणूनच ब्राह्मण लोक अस्पृश्यांचे खरे कैवारी. असून ब्राह्मणेतर लोकच अस्पृश्यांचे खरे वैरी आहेत असा ते नेहमी ब्रह्मघोष करीत असतात. ब्राह्मणेतर .

आड येतात हें आह्यांसहि कबूल आहे. पण ब्राह्मण कधींच आड येत नाहींत असें

मात्र आम्हास प्रामाणीकपणें म्हणता येत नाहीं. आपल्या पुढाऱ्यांच्या नांवाचा जप करतां करतां रा. सकट हें आतां आपल्या पुढाऱ्यांत इतके विलीन होऊन गेले आहेत कीं, स्वजातीचें हित कोठें आहे हें पहाण्याइतका आपलेपणा त्यांच्यांत उरलेला दिसत नाहीं. भाल्याच्या ता. २-५-१९२७ च्या अंकांत या मांगजातीच्या पुढाऱ्यानें , एक पत्र लिहिलें आहे की, महार लोक मांगांना कमी लेखतात, त्यांना आपल्या _ विहिरीवर पाणी भर देत नाहींत. आणि त्यांचा नवरा घोड्यावर बसून रस्त्यांतून जाऊं देत नाहींत. तेव्हां प्रथम महार लोकांनी मांग लोकांना समसमान cred, मग स्पृश्य हिंदूंशीं समानतेचा झगडा करावा. “ रा. सकटांचा महारांवरचा

आरोप खरा असेल. पण तेवढ्यावरून चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा

अधिकार तसेंच इतर सार्वजनिक हक्क प्राप्त करून घेण्याचा अधिकार महार लोकांस पोहोंचत नाहीं, हें त्यांचें म्हणणें अगदी नादानपणाचें आहे. घरधनी आपल्या घरांत मला शीरू देत नाहीं म्हणून घरधन्यास घराचा कब्जा घेण्यास माझी