१२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हरकत आहे असें म्हणून एखादा शेजारी अडथळा करू लागला तर त्यांचें म्हणणें ऐकून घेण्या ऐवजीं कोणीही झाला तरी त्याचें तोंडच रंगवील. महार लोकांविरुद्ध मांग लोकांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या तर जे कायदेशीर हक्क महार लोकांना मिळाले पाहिजेत ते हक्क आपण Fed Wh असा जर रा. सकट यांचा अंदाज असेल तर रा. सकट म्हणजे एक खुळे गृहस्थ आहेत असेंच मानावें लागेल. महार लोक जर अन्याय करित असले तर त्यांना ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न रा. सकट यांनी करावा. त्यांत त्यांना महारांचे पुढारी सर्व प्रकारची मदत करतील, असें आम्ही अभिवचन देतों. पण महार लोक मांग लोकांना भावाप्रमाणे लेखित नाहींत म्हणून ब्राह्मणांशी संगनमत करून महारांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न रा. सकट हे जर करतील तर ते निष्फळ होणार आहेत हें आम्हीं आधीच सांगतों. पण केवळ मांग लोकांच्या हिताच्या दृष्टीनें जरी पाहिलें तरी महार लोक आपणांस बंधुभावाच्या नात्यानें वागविण्यास तयार नाहींत, या सबबीवर मांग लोकांनीं वरिष्ठ हिंदूंशीं आपल्या हक्काचें भांडण भांडावयास पुढे येऊ नये ही कोणत्या शहाण्याची रीत आहे हें आम्हांस कळत नाहीं. चवदार तळ्यावर जाऊन पाणी घेणें हा अस्पृश्य मानलेल्या दरएक जातीचा कायदेशीर हक्क आहे. तो हक्क प्रस्थापित करण्यासाठीं प्रत्येक अस्पृश्य जातीने आपलें सर्वस्व खर्च करणें प्राप्त आहे. खरें पाहिलें असतां महार लोकांनी मांग लोकांना जर म्हटलें कीं, “ कार्य सर्वांचे; त्यासाठीं आम्हींच कां मरावें ?” तर त्यांत कांहीं वावगें होणार नाहीं. शिवाय आम्हीं आपल्या प्रयत्नाने खुलें केलेलें AS उपयोगांत आणून आयत्या पिठावर रेघा ओढणारे तुम्हीं कोण, असें हिणवितां येण्यासारखे असतांहि महार लोकांनी तसा भाव कधी दर्शविला नाहीं. उलट महार लोकांनीं सर्व अस्पृश्य जातींचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीं आपल्या रक्ताचे सिंचन केलें हा महार जातीचा मांग जातीवर उपकार झाला नाहीं असे कोण म्हणेल ? पण मांग जातीचें हित पहाण्यापेक्षां ब्राह्मण जातीचें हित पहाण्यांत गुंतून गेलेल्या मांग जातीच्या पुढान्यास हें Hard कसें ? खरा मांग जर असता तर तो महाराशीं समान हक्क मागण्या ऐवजी त्याने ब्राह्मणाशीं समान हक्क मागितले असते. एकाद्या महाराशी रा. सकट यांच्या जातभाईचा सोईरसंबंध झाला तर फार तर मांग लोक महारांच्या समान दर्जाचे होतील. पण सकटांचा सोईरसंबंध जर भालाकारांच्या जातभाईशी झाला तर मांग लोक महारांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे होतील हें उघड आहे. मग ज्यापासून महारांपेक्षां मांग लोक श्रेष्ठ होतील अशी मागणी करण्याऐवजी सार्वजनिक पाणवटठें अस्पृश्यांना खुले करण्याच्या कामांत रा. सकटांनी विरोध करावा हें कशाचें लक्षण आहे ? आमच्या मते हें, परवशतेचें लक्षण आहे. रा. सकट हे पुण्यांत