महारांनी सर्व अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्या रक्ताचे सिचन केले - Page 171

महारांनी सर्व अस्पृश्यांचे. . . . . आपल्या रक्ताचे सिंचन केले १२७

ब्राह्मण लोकांनीं स्थापन केलेल्या अस्पृश्यता निवारक मंडळाचे पगारी प्रचारक आहेत. रा. सकट यांनी अवस मागून किंवा ' दे दान सुटे गिराण ' म्हणून स्वतंत्र राहणीचा अवलंब केला असतां तरी त्यांना आपल्या मातंग ज्ञातीची बाजू निर्भिडपणें मांडता आली असती. पण ब्राह्मणांचे मीठ खाऊन त्यांच्या हिताच्या विरुद्ध जाणें रा. सकटांना शक्‍य नाहीं. ब्राह्मणानें पाळले पोसलेला कोणताही अस्पृश्य जातींतील माणूस अस्पृश्यांचे पुढारीपण घेण्यास नालायकच ठरेल, असें आमचें प्रामाणिक मत आहे. तोच न्याय मांगाचे पुढारी म्हणविणारे रा. सकट यांस लागू आहे. या जाणीवेनेंच कीं काय रा. सकट यांनीं कांहीं दिवसांपूर्वी चांलविलेल्या आपल्या मातंगबंधू पत्रांत मांगांचा पुढारी अजून यावयाचा आहे असे म्हटलें होतें. हें खरें असो, असेंच आम्हीं इच्छितों. मात्र त्या पुढाऱ्यानें येतांना आपल्या जन्मदात्या आईबापापासून पुरेशी शिदोरी संगाती आणावी, येवढीच त्याला आमची अगाऊ सूचना आहे. नाहीं तर पोटासाठीं स्वतःची अक्कल विकण्याची पाळी त्या बिचाऱ्यावर यावयाची |

सगळेच लोक भालाकाराप्रमाणें नादान नाहींत हें कबूल करण्यास आम्हांस आनंद वाटतो. दुसरीकडे ज्या दोन ब्राह्मण गृहस्थांचे पत्र! आम्ही छापलें आहे. त्यांना महाड येथें घडलेल्या प्रसंगाचा हिंदुसमाजावर काय परिणाम होईल याची भालाकारापेक्षां जास्त जाणीव आहे. म्हणून त्यांच्या म्हणण्याचा आम्हांस विशेष आदरपूर्वक विचार करावा असें वाटतें. हिंदुसमाजांतच राहून होतां होईल तों

आपली उन्नति करून घ्यावी, असें या दोन मित्रांप्रमाणें आमचेंहि मत आहे. तसेंच

स्पृश्य व अस्पृश्य यांच्यांत समानता प्रस्थापित झाली नाहीं तर अस्पृश्य लोक धर्मांतर केल्याशिवाय राहणार नाहींत ही वस्तुस्थितीहि आमच्या प्रमाणें आमच्या मित्रांसहि कबूल आहे, असें असतांना आम्हांस ' रामराम ' म्हणून अभिवंदन करणें योग्य आहे काय, असा आमच्या या दोन मित्रांस आमचा प्रेमाचा सवाल आहे. आमच्या मतें एकतर त्यांनी आम्हांस नमस्कार घालावयाचा होता. नाहीं तर जोहार तरी म्हणावयाचे होतें. या दोहोंत कांहीं तरी अर्थ आहे. पण ' रामराम ' असा मर्तिकाचा शब्द त्यांनी आम्हांसंबंधी वापरावयाचा नव्हता तो शब्द मराठे लोकांना खपतो. पण अस्पृश्यांतील महार लोकांस खपत नाहीं. त्यांनीं आपले क्षत्रियत्व, जोहारासारख्या अभिवंदनपर शब्दांत कां होईना, कायम राखले आहे. या बाबीतील आमचा आग्रह उगाच कांहीतरी पोरकटपणाचा आहे असें मात्र आमच्या या मित्रांनीं मानूं नये. आज हिंदुसंघटनेच्या आड जर कोणती एकादी गोष्ट येत असेल तर ती ब्राह्मणांच्या अंगात मुरलेली अहंमन्यता. ही

† पाहा, परिशिष्ट क्रमांक ७.