महारांनी सर्व अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी आपल्या रक्ताचे सिचन केले - Page 172

१२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अहंमन्यता आमच्या सदय मित्रांतहि वास करीत आहे हें त्यांनी आम्हांस नमस्कार लिहीण्याऐवजी रामराम लिहीला यावरून उघड होत आहे. ब्राह्मणांशिवाय इतरांस नमस्कार करावयाचा नाही ही रूढी या अहंमन्यतेचे व्यक्त रूप आहे. आणि ब्राह्मण्य आहे तें तिच्यांतच आहे. आमच्या मित्रांनीं जी चूक केली ती बुद्धिपुरःसर केली नसून रूढीमुळेच ती त्यांच्या हातून झाली असावी हें आम्ही

ओळखून आहोंत. पण ज्या ब्राह्मणांना आपला पोकळ श्रेष्ठपणा सोडून इतरांशी

समानतेने वागावयाचें असेल त्यांनीं ही अहंमन्यतादर्शक रूढी बदलली पाहिजे. बाब दिसावयाला लहान पण परिणामी मोठी असें वाटल्यावरून ही चिकित्सा करणें भाग पडलें आहे. ब्राह्मण्याचा त्याग करणाऱ्या लोकांतूनहि ब्राह्मण्याचे समूळ उच्चाटण होणें कसे कठीण होतें हें यावरून दिसून येतें.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत ता. २० मे १९२७.