महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 173

२८
महाड येथील धर्मसंगर
अस्पृश्य वर्गाची जबाबदारी.

गेल्या दोन अंक।त महाड येथील पाणी प्रकरणाच्या बाबतीत स्पृश्य हिंदूंचें तसेंच सरकारचें कर्तव्य काय आहे याचा उहापोह आम्हीं केला आहे. आज आमच्या अस्पृश्य बंधूनीं या बाबतींत काय केलें पाहिजे याचें दिग्दर्शन करण्याचें आम्हीं योजिलें आहें.

महाडचें चवदार तळे हें सार्वजनिक आहे. त्यावर सर्व जातींच्या लोकांस निर्विघ्नपणे पाणीं भरतां येतें. कोणी कोणाला हरकत करीत नाहीं. पण त्याच तळ्यावर महार, मांग, चांभार व ढोर इत्यादि जातींच्या लोकांनी पाणी भरलें असता ते स्पृश्य हिंदूस खपत नाहीं हें महाड येथील प्रकारावरून सिद्ध झाले आहें.

असें कां होतें ?

याचा जर आमच्या ज्ञातिबंधूनीं पुरतेपणीं विचार केला तर त्यांना कळून येईल कीं, हिंदुधर्मात त्यांना अपवित्र मानण्यात येतें. त्यांचा स्पर्श झाला असतां हिंदुधर्मीय मनुष्य ओवळा होतो व त्याची अशुद्धता घालविण्यासाठी त्यास सचैल स्नान करणें प्राप्त होतें. कांही ठिकाणीं तर त्यांची नुसती सावली पडली तरी देखील दोष घडतो व त्याचा परिहार करण्यास स्नान करावें लागतें. ही शुद्धाशुद्धतेची भावना कारणबद्ध असती तर तिच्याविरुद्ध कोणास फारसें काहीं म्हणतां आलें नसतें. एखादी स्त्री रजस्वला असेल तर ती त्या स्थितींत असेपर्यंत तिनें कोणास स्पर्श करूं नये हें म्हणणे मान्य करतां येईल. जो कोणी अमंगल असेल त्यानें तो त्या स्थितींत असेपर्यंत शुचिर्भूत माणसास शिवूं नये यासही [ना ] म्हणता येणार नाही. पण या जातीच्या लोकांनी स्पर्श केला असतां तो [कां ] [चालूं ] नये, याची संयुक्तिक अशी कारणमीमांसा कोणीच [देऊ ] [शकत ] [नाहीं. ] या जातीचे लोक अमंगल राहातात म्हणून त्यांचा [स्पर्श ] [होणें ] [निषिद्ध ] [मानण्यात ] [येतें ] [असें ] [जे ] सांगतात त्यांना या जातींत ज्या लोकांची [राहणी ] [स्वच्छपणाची ] [आहे ] [त्यांचा ] [स्पर्श ] तरी कोठें खपतो आहे ? या जातीचे लोक [अभक्ष्य ] [भक्षण ] [करतात ] [म्हणून ] [त्यांना ] दूर ठेवण्यांत येतें हें कारण देखील [या ] [कामी ] [अपुरें ] [पडतें. ] या जातीत असे

डब्ल्यू-२०७३-९ अ