439 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे +
।कतीतरी लोक आहेत की, जे मद्यमासाला कधी शिवत देखील नाहींत. तरीपण “मांस भक्षक अस्पृश्यांप्रमाणें त्यांनाही दूरच ठेवण्यांत येतें. शिवाय स्पर्श हा भक््याभक्ष्य यावर अवलंबून आहें असे जर म्हणावे तर मुसलमानांसारख्या अभक्ष्य अज खाणाऱ्या लोकास अस्पृश्य म्हणण्याची कोणा हिंदूची छाती होत नाहीं. सारांश,
अस्पृश्यता ही एक स्पृश्य लोकांची लहर आहे
असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आम्ही तुम्हांला अस्पृश्य मानतो म्हणून तुम्ही अस्पृश्य, या स्पृश्य लोकांच्या लहरीशिवाय अस्पृश्यतेला दुसरे कारणच दिसत नाहीं. या आपल्या लहरीला लोक रूढी म्हणतात व रूढीला कायदा मानून ते ती अस्पृश्यांवर जबरदस्तीनें लादण्याचा प्रयत्न करतात.
अस्पृश्यता निवारण्याचे बाबतींत एक विस्मयकारक गोष्ट दिसून येते ती ही कीं, या रूढीच्या संबंधांत अस्पृश्यांचे लोकमत काय आहे याची कोणी विचारपूस देखील करीत नाहींत. उलट
स्पृश्य जातींचे लोकमत अजून तयार नाहीं
सबब त्यांचें लोकमत तयार होईपर्यंत तुम्हीं अस्पृश्य राहिलें पाहिजे असें अगदी खुशाल सांगण्यांत येतें.
जी गोष्ट लोकांस पसत नाहीं, जिला लोकांचा विरोध आहे, ती राज्यकर्त्यांनी जुलूमानें, सक्तीनें अगर आग्रहानें लोकांवर ag नये असा राजकारणांत सरकारास बजावून सांगणारा एक पक्ष या देशांत आहे. बंगालची फाळणी कर्झन साहेबाने केली ही गोष्ट राज्यकारभार सुलभ व्हावा या दृष्टीनें कांही वावगी नव्हती, परंतु अशा प्रकारच्या फाळणीस बंगाली लोकमत अगदी विरूद्ध होतें व त्यास न जुमानतां इंग्रज सरकारनें जेव्हां आपलें म्हणणें शेवटास नेलें तेव्हां सरकार लोकमताला जुमानीत नाहीं म्हणून टिळकसारख्या राष्ट्रीय बाण्याच्या जहालानें टीकेंचें अस्त्र सोडून केवढा गहजब केला हें सर्वश्रुत आहेच. शेवटी इंग्रज सरकारनेही राज्य चालविणे तें लोकमताला धरूनच चालविले पाहिजें हें तत्त्व मान्य करून बंगालची फाळणी रद्द केली व आपला मोठेपणा बाजूस ठेवून सरकार अखेर लोकमतास शरण गेलें व मनलज्जेंने जरी नसलें तरी जनलज्जेंनें आपण लोकमतानुवर्ती आहोंत असें सिद्ध करून दिलें. लोकमताचा हा विजय झाला हें चांगलेंच झालें. पण या ऐतिहासिक गोष्टीच्या GRO आम्हांस आनंद न होता, तिडीक येते ती एवढ्यामुळेच कीं सरकारास लोकमताप्रमाणें वागावयास सांगणारे लोक स्वतः अगदी निर्लज्जपणे अस्पृश्यांचे लोकमतास पायांखाली तुडवितात. लोकमताकडे लक्ष देऊन अधिकाराचा उपयोग करावयाचा हया
डब्ल्यू-२०७३-९ ब