महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी. १३३
कोणतें हें त्यापासून भोगाव्या लागणाऱ्या अखेर परिणामावरून दरेकाच्या ध्यानांत
येतेंच, आणि म्हणूनच खोटे ग्रह व वाईट समजुती व्यवहारांत फार दिवस टिकत नाहींत. पण कांहीं ठिकाणीं कृती आणि तिचे परिणाम यांचा धागा दोरा इतका लांबचा असतों कीं, आपण जी कृती करतों तिचे परिणाम कोणतें हेंच आधीं प्रत्यक्षपणे कळत नाहीं, आणि तेणेंकरुन आपल्या कृतीच्या बरें वाईटपणाचा विचार करण्याची जरूरीच कृती करणारास भासत नाहीं. जातीभेद व अस्पृश्यता याविषयीं तरी असेंच आहे, या रूढी परिणामी वाईट आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव स्पृश्य लोकांस कधीच न आल्यामुळें त्या टिकून राहिल्या आहेत. आगीतल्या धगीस तुच्छ मानून जिभेवर घेणाऱ्यास ती जशी त्याच्या जीभेस फोड आणून आपली कदर करण्यास लावतें तसें अस्पृश्य लोक त्यांना अस्पृश्य म्हणणारांची जीभ उपटते तर कोणी कोणाला अस्पृश्य म्हणतेचना. महाडच्या परिषदेचें महत्व जें कांहीं आहे तें आमच्या मतें यांतच आहे. तिनें स्पृश्य लोकांस अस्पृश्यतेच्या रूढीचा एक कटू अनुभव आणून दिला आहे. त्यामुळें स्पृश्य लोक आतां विचार करू लागतील कीं, अस्पृश्यता पाळणें हा जरी धर्म असला तरी तो पाळणें सुळावरच्या पोळीप्रमाणें कठीण काम आहे. आजवर अस्पृश्यता सहज पाळतां येत होती; तिला कांहीं लागत नव्हते ; पण यापुढें ती पाळावयाची झाली तर तिच्यासाठी कांहींना आपले प्राण खर्ची घालावे लागतील हें स्पृश्य लोकांनीं ताडलें असेलच. कारण महाड येथें जरी अस्पृश्यांनी स्पृश्यांवर हात उगारला नाहीं तरी यापुढें होणाऱ्या प्रसंगात अस्पृश्य लोक प्रतिकार न करतां केवळ ARTA धनी होऊन राहतील हें मानणें चुकीचें होणार आहे. तेव्हां आमच्या अस्पृश्य बंधूंस आमचा असा सल्ला आहे की, त्यांनीं महाड येथें जो उपक्रम केला तसाच उपक्रम सर्वत्र सुरू करावा, अशा प्रकारच्या
प्रतिकार योगाशिवाय भागणार नाही.
नाही तर स्पृश्य लोकांतील विचारशून्य लोक अस्पृश्यतेच्या wera बरें वाईटपणाबद्दल विचार करावयासच लागणार नाहीत आणि हजारों वर्षाची जुनी अस्पृश्यता आणखी हजारों वर्षे राहील.
विचारी लोकांना विचाराप्रमाणे आचरण करावयास लाविले पाहिजे,
हा अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमाचा दुसरा महत्वाचा भाग आहे. जे लोक विचार करूनही त्याप्रमाणें आचरण ठेवीत नाहीत त्यांना ताळ्यावर आणण्याचा उपाय विचारशून्य लोकांस विचार करावयास लावण्याच्या उपायापेक्षां केव्हांही भिन्न असणारच. लोकमत फिरविणे आणि व्यवहारांत