आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन १३६
अन्यायाला परंपरा नाही.
ही विचारसरणी तो चालत आला आहे म्हणून तो आणखी पुढे चालूं राहावा रानवट माणसांची आहे. आमच्याप्रमाणे ज्याला न्यायाची चाड आहे, तो केव्हांही हेंच म्हणेल कीं, आहे तो जर अन्याय आहे, तर तो इतक्या दिवस चालू आहे. यामुळेच त्याला यापुढे राहूं देणें शक्य नाहीं. अस्पृश्यता हें एवढे मोठें पाप व एवढा मोठा अन्याय आहें कीं, तिचें Geren आतां, या घडीस झालें पाहिजे. ही आमची विचारसरणी आहे. ती मान्य करून तिला अनुरूप असें जर कोणी कांही उपाय सुचविलें तर आम्हीं त्यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करू. पण आमची खातरी आहें कीं, अस्पृश्यतेचे विलंब न लागता उच्चाटण करावयाचें असेल तर आम्ही सुचविलेल्या उपायांसारखें दुसरे गुणकारी उपाय सांपडणें कठीण आहे. फुकट व्याख्याने झोडण्यांत, अथवा मोठमोठाल्या परिषदा भरवून अघळपघळ ठराव पास करण्यांत कांही हंशील नाहीं. हे उपाय जे लोक स्वभावानें लोकमतानुवर्ति आहेत त्यांच्याकरितां सांगितलें आहेत. पण गतानुगतिक लोकांस जागृत करण्यास अग्नीचा डागच दिला पाहिजे, त्याशिवाय ते शुद्धीवर येणार नाहींत. कागदी खेळ कितीही वर्षे खेळलों तरी या लोकांच्या डोक्यांत कधीं प्रकाश पडावयाचा नाहीं, व कसलाच परिणाम होणार नाहीं. अस्पृश्यतेपायीं जेव्हां स्पृश्य लोकांचीं डोकीं फुटतील तेव्हांच आत्मयज्ञ करण्याइतकें पुण्य अस्पृश्यता पाळण्यांत आहे किंवा नाहीं, याचा ते विचार करूं लागतील. जागृति करण्याचा हा महत्वाचा कार्यभाग प्रतिकार योगाशिवाय दुसऱ्या अल्पस्वल्प उपायांनी कधींच उरकला जाणार नाहीं. आम्हीं बहिष्कार योग सुचविला हें पाहून तर कांहीं स्पृश्य लोकांचें पित्त खवळेल, हें आम्हांला माहीत आहे. पण आम्हीं त्याची बिलकूल पर्वा करीत नाहीं. आम्हांला हिंदुधर्माची किंमत नाहीं. आम्हांला किंमत आहे ती माणुसकीची, ती माणुसकी आम्हाला हिंदुधर्मांत राहून मिळती तर हिंदुसमाजावर बहिष्कार घालावा असा उपदेश आम्हीं केला नसता. हिंदुधर्माची तत्त्वें फार मोठीं आहेत. पण उदात्त तत्त्वांच्या मनोराज्यांत गढून जाऊन व्यवहाराला विसरणाऱ्या शाळेतील पोराष्रमाणे आम्ही मूर्ख नाहीं. आणि यदाकदाचित हिंदुसमाजानें आमची माणुसकी ओळखलीच तर ती आमच्या माणुसकीच्या स्वयंसिद्धतेमुळे ओळखणार नसून परिस्थितीजन्य अपरिहार्यत्वामुळेंच ओळखणार आहे. हें आम्हीं पक्केपणी जाणून
आहोंत. हिंदुसमाज झाला काय किंवा इतर समाज झाला काय तो परिस्थितीचा दास असणे अगदीं स्वाभाविक आहे. परिस्थितीची प्रत्यक्ष जाचणी किंवा तीव्र टोंचणी सुरू झाल्याखेरीज समाज आपल्या रूढ व्यवहारांत सहसा फिरवाफिरव करीत नाही. ही समाजाची सहज प्रवृत्ति ओळखून टिळक म्हणत असत कीं,