महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 183

महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी. १३९

महाडच्या पाणी प्रकरणावर लिहीलेली ही लेख माला पुरी करण्यापुर्वी आमच्या अस्पृश्य बंधूंस जे सांगणें आहें तें हें की ब्रह्मराक्षस लागतो तो भित्यापाठींच लागतो. सर्वशक्तिमान देवाला बळी द्यावयाचा झाला तर त्या कामीं व्याघ्रादि हिंस्त्र पशूंचा कोणी उपयोग करीत नाहीत. त्यांच्याऐवजी गरीब बिचाऱ्या कोंबड्यां-बकऱ्यांचा बली देण्यांत येतो.

आजच्या अस्पृश्य लोक कोंबड्या बकऱ्याप्रमाणें बली देण्यासारखे मेष राशीचे आहेत असें आम्हांस बिलकूल वाटत नाहीं. त्यांच्या पूर्वजांची तरी सिंह रास होती याची इतिहास साक्ष देत आहे. तसें जर नसतें तर नागेवाडीच्या महजूर सेटी बिन नागनाक महारांत एवढें तेज कोठून आलें असतें की, ज्या तेजामुळें राजारामाच्या सांगण्याप्रमाणे आपल्या पाटीलकीसाठी धारदिव्य करून कोणाचीहि कुमक न घेतां मोंगलांच्या ताब्यांत असलेला वैराटगड त्यांच्यापासून जिंकून त्यांने परत मराठ्यांच्या राज्यास जोडून दिला ! घरांत जेवणाच्या पंगतींत तसा समरात शूरांच्या पंगतीत जातीभेद पाळला जावा असा आग्रह धरणाऱ्या ब्राह्मण्यग्रस्त सरदारांनी ज्याचा गोट बाजुस काढावा म्हणून तक्रार केली पण ज्यानें हिरोजी पाटणकरासारख्या सरदाराकड्ून ' ज्याची तरवार खंबीर तो हंबीर [' ] असें वदवून घेऊन आपला गोट सर्वाच्या मध्यें राहण्याचा मान शाबूद राखीला व [शेवटी ] खर्ङ्याच्या लढाईत ज्यानें पठाणांच्या हातून परशुराम भाऊचा प्राण वाचविण्यांत अप्रतिम शौर्य दाखवून त्याला महार म्हणून तिरस्कार [करणाऱ्या ] [सरदारास ] खाली पाहावयास लावलें तो शिदनाक महार सिंह राशीचा नव्हता असें कोण म्हणेल ? पावन खिंडीच्या तोंडाशी मूठभर [मावळ्यांच्या ] [सहाय्यानें ] [विजापुरच्या ] प्रचंड इस्लाम सेनेचा धुव्वा SSAA बाजी [प्रभु ] [देशपांड्याप्रमाणे ] [जो ] [रायनाक ] महार रायगडावर मोर्चेबंदी करून १५ दिवसपर्यंत [इंग्रज ] [बहादुरांशीं ] [निकरांची ] झुंज करून गड़ाचें रक्षण करतां करतां [जिवानीशीं ] [गेला ] [तो ] [रायनाक ] [बाजी ] [मेष ] राशीचा होता काय ? तसेंच पेशवाईला^ अखेरची मूठमाती [देतांना ] [ज्यांचे ] [पूर्वज ] धारातीर्थी पडले व ज्यांची नांवें कोरेगावच्या [जयस्तंभावरां ] [कोरून ] [ठेवण्यांत ] आली आहेत त्या वीरांची [रास ] [सिंह ] [राशीशिवाय ] [दुसरी ] [कोणती ] [असूं ] शकणार ? ज्यांच्या पूर्वजांनी अस्पृश्यतेचे दाट कवच [फोडून ] [आपल्या ] [तेजानें ] व पराक्रमाने होत्याचें [नव्हतें ] [केलें ] [त्यांच्या ] [वंशजांना ] [साधा ] [प्रतिकार ] [योग ] [दुर्धर ] होईल काय ? आह्याला तसें मुळीच वाटत [नाही. ] त्यांच्यांत तेज आहे. जें नाही ती जाणीव. म्हणून सांप्रतच्या अस्पृश्यांपैकी [ज्यांना ] [आपण ] [कोण, ] [आपले ]

«पाहा, परिशिष्ट क्रमांक ८.

† पाहा, परिशिष्ट क्रमांक ९.