महाड येथील धर्मसंगर व अस्पृश्य वर्गाची जबाबदारी - Page 184

१४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

खरें आत्मस्वरूप कोणतें याची ओळख पटली असेल त्यांनी आपल्या कुळास लागलेला बट्टा धुवून काढण्यास नुकत्याच प्रारंभ झालेल्या धर्म संगरांत उभे ठाकण्यास सिद्ध व्हावें व आपल्या इतर ज्ञातिबांधवांस स्वकुलोद्धाराचा व मानव धर्मोद्धाराचा धडा घालून द्यावा.

भले कुलवंत म्हणावें | तेही वेगीं हजीर व्हावे |

हजीर न होतां Herd | लागेल पुढें ||

अशी काळ त्यांना श्रीसमर्थाच्या भाषेंत हांक मारुन सांगत आहे. आम्हांस आशा आहे की, ही काळाची हांक व्यर्थ जाणार नाहीं.

अग्रलेख : बहिस्कृत भारत ता. २० मे १९२७.