इथलाच वर्णभेद विलायतेला गेला तर त्याबदल कां तक्रार करण्यात यावी ? - Page 185

२९
इथलाच वर्णभेद विलायतेला गेला तर
MP त्याबद्दल कां तक्रार करण्यात यावी ?

एके काळी हिंदूलोकांत परदेशगमन निषिद्ध मानलें जात असें. पण विलायतचा वारा खाऊन मोठ्या मोठ्या पदव्या मिळवून परत आलेल्यांची जी चहा होते तशी आपली व्हावी म्हणून प्रायश्चिताला न भितां हिंदुस्थानांतून अनेक विद्यार्थी विलायती शिक्षणाचा आस्वाद घेण्याकरितां परदेशगमन करतात. त्यांतील बरेच खुद्द विलायतेस जातात व जेथें म्हणून विश्व विद्यालयें आहेत तेथें तेथें विखुरलेले असतात. त्यापैकी एडिनबरो येथें रहात असलेल्या हिंदी विद्यार्थ्यांनी yada प्रसिद्ध केलें आहे कीं तेथील रहिवाशी त्यांना अस्पृश्याप्रमाणें वागवितात. त्यांना कांही खाणावळींत मज्जाव आहे. युनिव्हर्सिटीत जे अनेक नाच तमाशे होतात

त्यांतहि त्यांना घेण्यांत येत नाही. वगैरे वगैरे प्रकारचा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यांत आला आहे. हा बहिष्कार किती तीव्र आहे व परदेशांतील आपल्या चिमुकल्या समाजात तो किती कडक रितीनें भासमान होत आहे याची कल्पना हिंदुस्थानांतील लोकांस होणें शक्य नाहीं असें ते अगदी केविलवाण्या शब्दांत जाहीर करित आहेत. ही विलायतेस जाणारी मुलें म्हणजे बऱ्याच अंशी श्रीमंतांची पोरें असतात. त्यांनी खेळत खेळतच अभ्यास करावयाचा असतो व तशाच प्रकारची त्यांची चालचलणूक असते. त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूति वाटण्याचे कारण नाही. शिवाय वर्णभेदावर जगणाऱ्या लोकांनी वर्णभेदाविरुद्ध तक्रार केली तर त्यांची दाद कोण घेणार. हिंदुस्थानांतील गोरे स्पृश्य व काळे अस्पृश्य हा तरी वर्णभेद यांचाच आहे. आणि हा वर्णभेद यांना इतका मानवलेला आहे कीं, अस्पृश्यांना स्पृश्यांच्या कोणत्याच व्यवस्थेत थारा मिळत नाही व हा अन्याय आहे असें हे लोक केव्हांच कबूल करीत नाहींत. मग इथलाच वर्णभेद विलायतेला आणि येथूनच गेलेल्या वर्णाश्रमी लोकांच्या पदरांत घातला गेला तर त्याबद्दल कां तक्रार करण्यांत यावी ? वर्णाश्रम उत्तम आहे तर त्याचा प्रसार हिंदुस्थानाच्या बाहेर होत आहे त्याबद्दल हिंदुधर्माभिमान्यांस नको का आनंद व्हावयाला ? वर्णाश्रमांत वाढलेल्या या पोरांना वर्णाश्रम व्यवहारांत आलेला पाहून संताप यावा ही मोठी नवलाची गोष्ट आहे ! पहिला नंबर लागत असेल