सार्वजनिक सोईचा उपयोग करूं देणे हा कायद्याचा प्रश्न आहे, शिष्टाचाराचा नव्हे - Page 187

३ 0

सार्वजनिक सोईचा उपयोग करू देणें
हा कायद्याचा प्रश्‍न आहे, शिष्टाचाराचा नव्हे

अक्कलेचे अन्न भालाकाराच्या कधी पचनी पडेल असें दिसत नाहीं. अर्ध्या हळकुंडाने पिवळें होणें कांही अशक्य नाही. प्रश्न आहे मूळ कांतीचा. पण भालाकारासारख्या काळ्या कंदुकाला मणभर हळदीचे कोटिंग दिलें म्हणून काय तो पिवळा होणार आहे ? रंग चढलाच तर तो हिरवा होईल. अशा अपरिपक्व भालाकारानें जो कोटिक्रम लढविला होता त्यास आम्हास जें काय उत्तर द्यावयाचें होतें तें गेल्या अंकांत देऊन टाकलें आहे. पुन्हा पुन्हा तोचतो कोटिक्रम करीत बसणाराच्या पाणचटपणास उत्तर देऊन आम्ही आपल्या पत्राची बहुमोल जागा

asi इच्छित नाही. वकिलीची परीक्षा पसार करून गोळा केलेली ज्ञानाची पुंजी

दोन अंकांतच संपून गेल्यावर पाटठीपुस्तकाची नुसती तोंड ओळख असणाऱ्या मांग पुढाऱ्यांची अक्कल उसनी घेऊन एक नवा कोटिक्रम भाल्याने तिसऱ्या अंकांत केला होता. त्याचीही वासलात आम्हीं लाविली आहे. आता भालाकाराच्या युक्तिवादा संबंधाने विशेष कांही लिहिण्याचे कारण नाही. फक्त शेवटी झडती म्हणून एका गोष्टीचा खुलासा करणें जरूर आहे. आणि तेवढ्यापुरतें आज आम्हीं लिहीत आहोत. भालाकाराने जी पिरपीर चालविली आहें तिच्यांत अस्पृश्य वर्गाच्या मागण्यांच्या विपर्यास करण्यांत येत [आहे. ] अस्पृश्य लोक सहपान, सहभोजन व मिश्रविवाह इत्यादि हकक मागत आहेत [असें ] [भलतेंच ] [एक ] कुभांड त्यानें रचिलें आहे. अस्पृश्य वर्गाच्या मागण्या काय आहेत [याची ] [फोड ] आम्ही “बहिष्कृत भारताच्या” दुसऱ्या अंकांतील [अग्रलेखात ] [केली ] [आहे. ] त्यांत शिष्टाचारान्वयें इष्ट वाटणारी देवाण [घेवाण ] [व ] [कायद्यानें ] [प्राप्त ] [होणारे ] [हक्क ] [या ] दोहोंतील फरक आम्ही सर्वांच्या नजरेस आणून [दिला ] [आहे. ] सहपान, सहभोजन व मिश्रविवाह या गोष्टी शिष्टाचाराच्या [आहेत ] [हें ] [आम्ही ] [स्वतःच ] [कबूल ] [केलें ] आहे. कोणाही ब्राह्मणाने स्वधर्मीय जिव्या [मांगाला ] [आपली ] [मुलगी ] [देण्यापेक्षां ] विधर्मीय जैनुद्दीनास देऊन त्याला आपला [घरजांवई ] [करून ] [घेतला ] [तर ] [त्याबद्दल ] जिव्या मांगाला अशा राष्ट्रीय [ब्राह्मणावर ] [कांही ] [दावा ] [करता ] [येणार ] [नाही. ] कारण कोणी कोणाला मुलगी [द्यावी, ] [कोणी ] [कोणाच्या ] [पंगतीला ] [बसावें ] [हा ] [शिष्टाचाराचा ] प्रश्न आहे. पण सार्वजनिक सोईचा उपयोग [करणें ] [हा ] [कायद्याचा ] [प्रश्न ] [आहे. ]