ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण या काळांत कोणासच चालणे शक्य नाही. - Page 191

ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण . . . . . चालणें शक्य नाही. १४७

महत्त्वाचा प्रश्‍न नाहीं. जे लोक इतरांना जनावरां पेक्षांहीं कमी लेखतात, इतरांबद्दल ज्यांच्या मनात सदैव तिरस्कार आणि इतरांच्या बुद्धिमतेबद्दल ज्यांच्या मनात सदैव शंका अशा लोकांच्या हाती शिक्षण देऊन समाजाचें वाटोळे आणखी किती दिवस करावयाचे ! शाळेमध्ये नुसत्या बाराखड्या शिकवावयाच्या असत्या तर ती गोष्ट निराळी; पण शाळेत मुलांची मने सुसंस्कृत करून त्यांना समाजहितास योग्य असें वळण लावावयाचे असतें. शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचें कारखाने आहेत. अर्थात या कारखान्याचा फोरमन जितका शहाणा असेल तितका उत्तम माल कारखान्यांतून बाहेर पडणार आहे. शाळा म्हणजे कांही हिंदु उपहार गृह नव्हे की त्यांत ब्राह्मण भट्यारी ठेवला की भागले, ब्राह्मणांच्या हातचें अन्न जरी सर्वांना चालत असलें तरी ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण या काळांत कोणासच चालणें शक्‍य नाही. तरी सरकारने याचा पुरता विचार करावा व ट्रेनिग कॉलेजांत अस्पृश्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणांत , जागा द्याव्यात. सुधारणा करतां आली नाही म्हणून न्याय देखील करूं नये काय ?

ES SS i

' आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३ जून १९२७.