अशा दुष्ट व पापी लोकांच्या. ... . . कलम कां नसावे ? १४९
स्पर्शास्पर्श भावनेचा अतिरेक आहे. स्पर्शास्पर्श भावनेनें पछाडलेला हिंदु किती निर्दय असूं शकतो याचें हें एक हृदयस्पर्शी उदाहरण आहे. गाईसारख्या जनावराचा गळा HY नका म्हणून हंबरडा फोडणाऱ्या हिंदूच्या अंतःकरणाला प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्राणांतिक स्थितीत असलेल्या एका स्त्रीला पाहून दयेचा, करुणेचा लवमात्र पाझर He नये या मनोवृत्ती सारखी मनोवृत्ति हिंदू जाती खेरीज अन्य कोणत्याच मानव जातींत दिसावयाची नाहीं ! याचें कारण अगदी उघड आहे. हिंदूंना गोब्राह्मणाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट वंदनीय नाही. वहा महामंत्र उपजतांच त्यांना दिला जात असल्याकारणाने त्यांचा हा विलक्षण स्वभाव सहज बनून जातो. ज्या धर्माची कल्पना या घोर मनोवृत्तीस प्रसवते त्याचा नायनाट झाल्या खेरीज हिंदूच्या क्षुद्र मनोभावना केव्हांच लयास जाणार नाहींत. जे स्पृश्यांतील मूर्ख लोक अस्पृश्यांनी आपली शुद्धी करून घेतली पाहिजे असा मोठा टेंभा मिरवून सांगत फिरतात त्यांनीं या गोष्टीवरून खरें अशुद्ध कोण याचा विचार करावा. आतां बाई वारल्याचें विशेष नाहीं. आलेल्या डॉक्टरने जें करावयाचें तें केलें असतें तरी देखील जें होणार तें टळलें नसतें. पण अशा करणीमुळें रोगी मरण्यासारखा नसतांही मरावयाचा. तेव्हां अशा मनोवृत्तीला कांहीं इलाज करतां आल्यास तो करणें अवश्य आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांत वैद्यकीचा धंदा इतका जनकारणी मानला जातो की, वैद्याला कोणत्याहि वेळी कोठेही बोलावलें असतां गेलें पाहिजे असा या धंद्याचा शिष्टाचार आहे. व त्या शिष्टाचाराची अंमलबजावणी वैद्य लोकांची जी संस्था असते ती मार्फत होते. या देशांत पाश्चिमात्य वैद्यकीचा अभ्यास करून पारंगत झालेले जे लोक आहेत त्यांनीही हा शिष्टाचार मान्य केला आहे. पण असें असूनही जो डॉक्टर तो पाळीत नाहीं त्याच्या निंद्य वर्तनाचे नियंत्रण अन्य उपायांनी करणें अवश्य आहे. एकादी गोष्ट करणें हें ज्याचें कर्तव्य असून तें तो करित नाही व त्याचे न करण्यानें दुसऱ्याचे नुकसान झालें तर त्यात गुन्हा होतो अशा तत्वाची अनेक कलमें पिनल कोडांत आहेत. मग अशा दुष्ट व पापी लोकांच्या पारिपत्यासाठी पिनल कोडांत vere नवें कलम कां घालण्यांत येऊं नये ?
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. ३ जून १९२७.