३४
अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ
अस्पृश्यतेची कल्पना हिंदू धर्मातच काय ती आहे असें नाहीं. हिंदू धर्माप्रमाणे इतर धर्मातही ती आढळते. यहुदी धर्मात प्रेताला शिवल्याने मनुष्य ओंवळा होतो असें सांगितलें आहे. त्या धर्मात यज्ञांतील मांस सोवळ्याने भक्षण करण्याची चाल होती. व तसला सोवळा माणूस इतर ओवळ्या माणसाला अस्पृश्य मानीत असे. सुवेराचा व विटाळशीपणाचा विटाळ यहुदी धर्मात सांगितला आहे इतकेंच नव्हे तर कोणत्याहि कारणामुळे एकाद्या यहुदी माणसाच्या शरिरांतून रक्तस्त्राव होत असता त्यास अस्पृश्य मानावें अशीही पण यहुदी धर्माची अनुज्ञा आहे. पारशी धर्मातही अस्पृश्यतेची कल्पना असलेली दिसून येते. पारशी धर्मग्रंथाच्या दृष्टीनें पाहातां कोणताही मनुष्य खालील तीन कारणांमुळे “ ताबू “ (अस्पृश्य) होऊ शकतो. (१) मृताला शिवलें असतां ; (२) विटाळशीपणामध्ये स्त्रिया असतां व (३) वरील अस्पृश्यांस स्पर्श केला असतां. हिंदु धर्माप्रमाणेच या दोन धर्मात अस्पृश्यतेच्या कल्पनेचा प्रादुर्भाव झाला असतांही हिंदुधर्मांतच अस्पृश्य वर्ग कां निर्माण झाला व यहुदी व पार्शी धर्मात कां झाला नाहीं, हिंदु धर्मातील अस्पृश्यता ही त्रिकालिक कां ठरली व इतर धर्मात ती तत्कालिक कां ठरली, तसेंच इतर धर्मांत या अस्पृश्यतारुपी बहिष्कारांतून मुक्त होण्यास कसा मार्ग ठेवला होता व हिंदु धर्माने तो कां ठेवला नाही इत्यादि प्रश्न चर्चा करण्यासारखे आहेत व त्यांची केव्हां तरी एकदां चर्चा करण्याचा आमचा मानस आहे. आज फक्त अस्पृश्यता निवारणाच्या प्रयत्नाचा आढावा काढण्यांचें आम्ही योजिलें आहे. आणि त्यासाठी Vad सांगणें बस्स आहे कीं, अस्पृश्यतेच्या कल्पना जरी सर्व देशांतून व धर्मातून आढळून येतात तरी
पिढीजाद अस्पृश्य वर्ग हिंदुस्तानाशिवाय अन्यत्र area नाहीं
या पिढीजाद अस्पृश्य वर्गास स्पृश्य करून घेण्यास या देशांत कांहीच प्रयत्न झाला नाहीं असें म्हणतां येत नाहीं. या बाबतीत जे प्रयत्न झाले त्यांचे कालमानपरत्वें दोन भाग करतां येतील. (१) प्राचीन काळांतील प्रयत्न, व (२) आधुनिक काळांतील प्रयत्न. प्राचीनकाळी प्रथमतः गौतमबुद्धानें अस्पृश्यता निवारणाची मुहूर्त मेढ रोंविली. वेदांतांत जरी समता प्रतिपादन केलेली होती