अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 195

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ १५१

तरी पण कर्मठ लोकांच्या प्राबल्यामुळे वेदांतांतील या तत्वाला व्यवहारांत कोठेच ठाव नव्हता. कर्मठांच्या छापामुळे धर्माच्या नांवाखाली समता व प्रीति असावयाची ती एकीकडेच राहून त्याठिकाणी जातिभेदाची विषमता व हिंसा चालू झाली. या विषमतेचे व हिंसेचें खंडण करण्यासाठींच बुद्धाचा अवतार झाला व त्यानें सर्वांवर आत्मवत्‌ दृष्टि ठेवणें, दुसऱ्यास कोणत्याही प्रकारें दुःख न देणें याचा उपदेश केला. इतकेच नव्हे तर सर्व मनुष्यांमध्ये असलेलें नैसर्गिक एकजिनसीपण व्यवहारांत उतरविले. याला एकच पुरावा पुरे आहे. हिंदुधर्मातील भिक्षुवर्ग फक्त ब्राह्मण जाती पैकीच असूं शकतो. wi gar आपल्या भिक्षुवर्गात सर्व जातीच्या लोकांस स्थळ दिलें होतें. स्थविर नांवाच्या एका भंग्यास बुद्धानें आपल्या भिक्षुवर्गात घेतल्याची कथा सुप्रसिद्ध आहेच. बुद्ध धर्माचा पाडाव होऊन जेव्हा हिंदुधर्माची घडी पुन्हा बसविण्यांत आली तेव्हां अर्थातच बुद्धाने आरंभिलेल्या अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याची पिच्छेहाट झाली व अद्वैतपंथ स्थापन करणारे शंकराचार्य यांनी व्यावहारिक व पारमार्थिक असे आचरणाचे व सत्याचे दोन भेद करुन समतेचा प्रकार हा काय तो पारमार्थिक दशेपुरता आहे असें ठरविले. समतेच्या तत्वाला अशापरी मर्यादा घातली गेल्यामुळें व्यवहार दशेंतील भेदाभेद वाढत गेला, व त्यास आळा घालण्याची जरूरी शंकराचार्यास किंवा त्यांचें अनुयायी मध्वाचार्य व वल्लभाचार्य यांस वाटली नाहीं. परंतु विशिष्टद्वैत पंथाचे आद्य प्रवर्तक श्रीरामानुजाचार्य यांनीं मात्र या बाबतींत उत्कृष्ट कामगिरी केली. हिंदुधर्मांत समताभावाचा जर कोणी जोराचा पुरस्कार केला असेल व अमलांत आणला असेल तर तो या आचार्यानीच होय. खुद्द रामानुजाचार्यांचा गुरू ब्राह्मण नव्हता. त्यांनी कांचीपूर्णनामक ब्राह्मणेतराला गुरू केलें. इतकेंच नव्हे तर त्यांच्या जुन्या चालीच्या बायकोने कांचीपूर्ण जेवल्यानंतर जागा शुद्ध करून त्याचा अपमान केला यामुळे संतप्त होऊन त्यांनें आपल्या बायकोला घराबाहेर घालवून दिलें, व आपण संन्यासी बनला. पुढे संन्यासाश्रम घेऊन उपदेश करूं लागल्यानंतर कुंभकोन येथें त्यांचा विजय झाल्यावर ते तिरुवल्ली येथे गेलें. तेथें त्यांचा मुक्काम असतां एका चांडाळ स्त्रीशी त्यांचा संवाद झाला व त्यांत त्यांना असें आढळलें कीं, तिची मानसिक उन्नति बरीच झालेली आहे. तेव्हां सर्वादेखत ते म्हणाले “ हे ! चांडाळ स्त्रीये ! मला क्षमा कर. तूं माझ्यापेक्षां जास्त पवित्र आहेस “ असें म्हणून तिला त्यांनी आपल्या पंथाची दीक्षा तत्काल दिली आणि तिची मूर्ति करून तेथील देवालयांमध्ये स्थापन केली. तिची मूर्ति अजूनही तेथील देवालयांमध्ये दाखविली जाते. व सर्व भाविक लोक तिची भक्तिभावाने पूजा करितात. धनुर्दास हा तर अस्पृश्यच होता. परंतु रामानुजाचार्यानीं त्याला आपला शिष्य केलें व