१५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यावर आचार्याचा इतका लोभ होता की नदीवर स्नानाला जातांना ते आपल्या दाशरथी नामक ब्राह्मण शिष्याच्या खांद्यावर हात टाकून जात परंतु स्नान करून परत येतांना दाशरथीच्या खांद्यावर हात न ठेवता ते धनुर्दासाच्या खांद्यावर हात ठेऊन येत. असें करण्यांत अस्पृश्यतेचा उघडपणें इनकार करण्याचा त्यांचा हेतु होता हें उघड आहे. यादवगिरीवर नारायणाचें देऊळ श्रीरामनुजाचार्यानी जेव्हां बांधिलें तेव्हां त्यांत सर्व अस्पृश्य जातींच्या लोकांचा प्रवेश व्हावा अशी योजना आचार्यांनी करून ठेवली होती. देवळाजवळील तळ्यामध्ये सर्व अंत्यजांना स्नान करण्याची परवानगी असे व त्यांना देवळांत देवदर्शनाला जाण्याची मोकळीक असे. सध्यां ही आज्ञा फक्त उत्सवाच्या दिवसा पुरतीच नियमित केली गेली आहे हें खरे; पण त्यावरून मूळ आचार्यांचा उद्देश किती समतेचा होता हें कळून येतें. आचार्यानी आपल्या संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी सातशें मठ स्थापिले होते. परंतु त्यांच्याकडून मूळ आचार्यानें आरंभिलेले अंत्यजोद्धाराचें काम फारशें झालें नाही. नाहीं म्हणावयास रामानुजाचार्यांपासून पांचवे आचार्य रामानंद यांनी अस्पृश्यतानिवारणाचे बाबतींत बरीचशी कामगिरी केली. ज्या बारा शिष्यांच्या हातून त्यांनी आपला कार्यक्रम चालविला होता ते सर्व हीन मानलेल्या जातींचे होते. रामानुज सांप्रदायाने ज्याप्रमाणें स्पर्शास्पर्श भेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणें, चैतन्य सांप्रदायानेंही केला, किंबहुना सर्वात जास्त प्रमाणांत केला असें सुद्धां म्हणता येईल. ज्याप्रमाणें रामानुजाचार्यांनीं ठिकठिकाणची पवित्र देवालयें अंत्यजांना मोकळी केली त्याचप्रमाणे या चैतन्य गुरुने Was देऊळ सर्व लोकांना मोकळे करुन दिलें. आज अनेक वर्षापासून जगन्नाथाच्या देवळामध्यें सर्व लोक सारखे आहेत असें उघडपणे मानण्यांत येत आहे. खाण्यापिण्यामध्यें व नुसत्या स्पर्शामध्यें कोणत्याही जातीच्या माणसाला दूर केलें जात नाहीं. ओवळेंपणा मानावयाचाच नाहीं अशी तेथील पद्धत आहे. सर्व जातीच्या लोकांचा-अंत्यजांचा सुद्धां-प्रवेश जगन्नाथाजवळं सारख्यां रितीनें होत आहे. सर्व जातीचे व सर्व मताचे लोक आपला जन्मत: उच्चनीच भाव विसरून जर कोणत्या देवापुढे जमत असतील तर तो पुरीमधील जगन्नाथच होय. या सर्व प्रयत्नांचा फारसा परिणाम झालेला नाही. बुद्धधर्माच्या विरुद्ध जी मन प्रवृत्ति एकदां जोरावली ती पुन्हां जातिभेदाकडे झुक लागली. तिला योग्य चलन न मिळाल्यामुळे ती उत्तरोउत्तर जास्त जास्त दृढ होत गेली व शेवटी ती इतक्या थराला पोहोचली कीं पूर्वीच्या चार वर्णांच्या चार पाच हजार जाती व पोटजाती झाल्या. बुद्ध प्रतिपादित बंधुत्व जाऊन प्रत्येक