अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 197

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ 943

जात निराळी व ती मधील पोट भेद निराळे असा तुटकपणा आला व सोंवळ्याओंवळ्याच्या कल्पना इतक्या वाढल्या कीं पुढे सोळाव्या शतकांत साधुसंतांनी सत्यशोधकी कुऱ्हाडीचे किती तरी घाव घातले तरी अस्पृश्यतारूपी फोफावलेला वृक्ष त्यांच्या हातून तोडला गेला तर नाहींच पण त्याचें पान सुद्धा त्यांच्यानें हाललें नाहीं.

आधुनिक काळांतील अस्पृश्यता निवारणाच्या प्रयत्नास इंग्रजी अमदानीपासून सुरवात झाली आहे असें म्हणण्यास कांहींच हरकत नाही. या कालांतील पहिला सुधारक म्हणजे राजा राममोहनराय. सती वगैरे सारखे अनिष्ट सामाजिक आचार राजा राममोहनराय यांच्या प्रयत्नानें बंद झाले ही गोष्ट खरी आहे तरी पण सामाजिक प्रश्नांपेक्षा धार्मिक प्रश्‍नांवरच त्यांचा विशेष भर होता हें निर्विवाद आहे. जोपर्यंत धार्मिक मतांचा, खरें खोटेपणाचा विचार चालू होता तोंपर्यंत सामाजिक प्रश्‍नांकडे कोणाचेंच लक्ष वेधले नव्हतें. राजकीय चळवळ जेव्हां सुरूं झाली तेव्हां सामाजिक प्रश्‍न पुढें येत चाललें. कारण सामाजिक पुनर्घटनेचा प्रश्‍न हिंदुलोकांनी हातीं घेतल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याचे चमचाभर पाणीसुद्धां हिंदु राष्ट्राच्या पचनी पडणार नाहीं. उलटी होईल ! असें बजावून सांगणारा एक पक्ष होता. नुसती राजकीय चळवळ करावी म्हणणारांनीं राष्ट्रीय सभा* स्थापन केली व सामाजिक सुधारणेची चिंता वाहणाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या तोडीला म्हणा किंवा जोडीला म्हणा सामाजिक परिषद स्थापन केली. या दोन पक्षांत आधी काय ? सामाजिक की राजकीय या प्रश्‍नावर कांहीं वर्षे वाद चालूं होता. त्यात आधीं राजकीय म्हणणाऱ्या लोकांचा पराजय झाला असता तर अस्पृश्यते सारखा सामाजिक प्रश्‍न लवकर सुटण्याचा मार्गाला लागला असता. पण त्यात आधी सामाजिक म्हणणाऱ्या लोकांचाच पराभव झाला. मात्र तेवढ्यावरून आधी सामाजिक हा पक्ष मुळांतच कमकुवत असावा असे मानणें चुकीचें होणार आहे. या पक्षाच्या पराजयाचें कारण म्हणजे जातिवाचक प्रश्‍नांना सामाजिक स्वरूप देण्यांत आलें हेंच होय. सामाजिक प्रश्‍न अनेक कारणांमुळे उद्‌भवतात. कांही अनिष्ट कुलाचारामुळे उद्‌भवतात; कांही अनिष्ट देशाचारामुळें उद्‌भवतात. ज्यांचा उगम कुलाचारांत असतो त्यांची व्याप्ती त्या कुलांतील लोकांपुरतीच असते. व ज्यांचा उगम देशाचारांत होतो ते प्रश्‍न

अखिल जनतेचे प्रश्‍न होऊन बसतात. पण सामाजिक परिषदवाल्या सुधारकांना

हा भेद कळला नाहीं. आणि म्हणूनच जातीभेद व स्पर्शास्पर्श भेद इत्यादि सर्वजनव्यापी wear विसरून जाऊन विधवांचें वपन, गतभर्तृकांचें पाट व पोरपणांतील लग्नें अशा कुलवाचक प्रश्नांवरच त्यांनीं रणें पाडली. हे प्रश्‍न