अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 199

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ १५५ पाण्याचा ओघ हरिद्वारपर्यंत अखंड जावा, मुसलमान कसाबांच्या हातून गाईचा गळा सोडवावा, आणि हिंदु समाजास राजकारणांत त्याच्या संख्येच्या प्रमाणांत त्यास हक्क द्यावे वगैरे प्रश्‍नांसंबंधी सरकारकडे दाद मागविण्यापलिकडे या संस्थेने प्रत्यक्ष अशी कोणतीच कामगिरी केली नाहीं. सामाजिक सुधारणेचा कोणताच असा उपक्रम या संस्थेच्या हातून झाला नाही. नाही म्हणावयास अस्पृश्यता निवारणासंबंधी केवळ लोकमत अजमाविण्याच्या हेतूनें एक पत्रक तिनें काढलें होतें. पण ज्या अर्थी पटेलच्या मिश्रविवाहाच्या बिलाला या सभेंनें विरोध केला होता, त्या अर्थी अस्पृश्यता निवारणाचे बाबतींत तिच्यांनें कोणती कामगिरी झाली असती याचा अंदाज करतां येण्यासारखा आहे. १९१८ साली या सभेची पांचवी व शेवटची बैठक काँग्रेस बरोबर दिल्ली येथें राजा रामपालसिंग यांच्या अध्यक्षतेखालीं भरविण्यांत आली होती. तेथील तिची कामगिरीही _ वाचाळते पलिकडे गेलेली नव्हती. जातवार प्रतिनिधींच्या तत्वास विरोध, गोवधाची कायद्यानें बंदी आणि जर्मन युद्धांत हिंदी लोकांनीं केलेल्या मदतीबद्दल इकडून विलायतेंत नेलेले जुने संस्कृत ग्रंथ व पुराण्या वस्तु यांचा हिंदुस्थानास परत अहेर, या व अशा प्रकारच्या सरकारास विनंत्या व आयुर्वेदाकडे दुर्लक्ष केल्यामुळें सरकारची कानउघडणी ह्यातच तिचें कार्य व तिचा अवतार हीं दोन्हीं संपुष्टांत आली. पुढची दोन तीन वर्ष रौलत बिलाचा नाच व खिलापतीचा पिंगा घालण्यांत गेली. पुढे सन १९२१ साली हरिद्वार येथे जेव्हां तिचें अधिवेशन भरविण्यांत आलें, तेव्हां तेथें या

सर्व देशीक हिंदुसभेचें रूपांतर होऊन ती हिंदु महासभा

या नावांने प्रगट झाली.

या हिंदु महासभेची कांही किरकोळ अधिवेशने भरल्यानंतर तिचें सर्वात मोठे असे एक अधिवेशन बनारस येथें १९२३ सालच्या ऑगस्ट महिन्यांत भरविण्यात आलें. त्या ठिकाणी हिंदु समाजाच्या अनेक रोगांवर कोणकोणते उपाय योजावे हें ठराव रूपानें निश्‍चित करण्यांत आले होते.राष्ट्रीय कांग्रेसनें सामाजिक सुधारणेचा प्रश्‍न हातीं घेतला नाहीं याबद्दल सर्व अस्पृश्य वर्ग दिलगीर होता, व १९१७ सालच्या कांग्रेसच्या ठरावानेंहीं कोणाचें समाधान झालें नव्हते. कारण त्या ठरावांत रडत्याची आसवें पुसण्यापलिकडे कांही मर्म नव्हतें हें सर्वांस ठाऊक होतें. पण १९२३ सालापासून काँग्रेसच्या बेफिकिरीबद्दल अस्पृश्य वर्गास पर्वाप्रमाणें विषाद वाटत नसें. हिंदु समाजानेंच आपला प्रश्‍न हातीं घेतला आहे तेव्हां काँग्रेस ओस पडूं दे असें म्हणून बऱ्याच अस्पृश्यांना धीर आला होता. मालवियांसारख्या कड्या धर्माभिमान्याने दुःखाश्रु गाळून हिंदू महासभेच्या