१५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
प्रतिनिधीस अस्पृश्यता निवारण करण्यास चालना दिली ती महासभा अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविल्याशिवाय रहाणार नाही असे वाटणें अगदीं सहाजिकच होते. पण या हिंदुमहासभेची तीच गत झालेली दिसते. आणि तिची कार्यक्षमता शब्दापलिकडे जाणार नाही, असें म्हणण्यास कांही हरकत वाटत नाहीं. हिंदु महासभेवरील हा आरोप आमचा नाहीं. तो आरोप स्वामी श्रद्धानंद यानींच केलेला आहे. पूर्वी दोन महिने हिंदु महासभेच्या निष्क्रियतेस कंटाळून त्यांनी जो राजीनामा दिला त्यांत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे कीं, “ हिंदुमहासभेला आपले ठराव अमलांत आणावयाची उत्कंठा लागलेली दिसत नाहीं ; इतकेच नव्हे तर जे जे सभासद तिचे ठराव अमलांत आणण्यास उद्युक्त होतात त्यांच्या मार्गात अडचणी उत्पन्न करण्याचा ती प्रयत्न करते. हा आशेचा भंग म्हणजे कडेलोट नव्हे तर काय ? प्राचीन समाज सुधारकांचे हातून अस्पृश्यता निवारण झाले नाहीं तरी तें क्षम्य आहे. ते केवळ माणुसकीच्या स्वयंसिद्धतेवर भर देऊन अस्पृश्यता नष्ट करण्याच्या मार्गाला लागले होते. आधुनिक कालांतील परिषदवाल्यांनी जी अस्पृश्यांची उपेक्षा केली तिचें कारण वर दिलेच आहे. पण अस्पृश्यता निवारणाची खरी कळकळ असूनहि ते अचल राहिले असते तरी त्यांचें करणें दूषणास्पद झाले नसतें. अस्पृश्यता फार तर स्वराज्याच्या आड येईल असें त्यांना भय होतें. पण त्याला भिऊन त्यांनी अस्पृश्यता काढली नसती तर
आपण pè स्वराज्यवादी नाहींत हें फार तर त्यांना कबूल करावें लागलें
असते. पण त्यांत लाज कसली ! कारण तसे असेल तर आम्हांस स्वराज्यच नको असें म्हणणारे अगणिक लोक अजूनहि आहेत. पारतंत्र्याची जाचणी इतकी तीव्र नाही व यामुळे एवढा त्याग करावयास सुधारकही तयार झाले नाहीत तर त्यांचा विशेष अपराध आहे असें म्हणतां येणार नाही. हिंदुमहासभेची गोष्ट या सर्वांहून अगदी निराळी आहे. परिस्थितीची जाचणी तिला जितकी आहे तितकी दुसऱ्या कोणालाच नव्हती. हिंदु महासभेपूर्वीच्या होऊन गेलेल्या सुधारकांस अस्पृश्यता निवारणाचे अपरिहार्यत्व भासले नव्हतें. पण ऐन संकटाच्या भोवऱ्यांत सांपडलेल्या लोकांनी हिंदु धर्मास वाचविण्यास ही संस्था निर्माण केली आहे. व तिच्या चालकांस पुरतेपणी ठाऊक आहे कीं, हिंदु समाजाची संघटणा केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. परंतु कलकत्ता, दिल्ली, लाहोर, रावळपिंडी, कोहाट, सोलापूर, गुलबर्गा इत्यादि स्थळीं घडलेल्या हिंदु मुसलमानांच्या दंग्यांत हिंदूंची जी वाताहात झाली ती उघड्या Sour पहात असतां देखील हिंदु महासभेने आपले डोळे मिटावेत यापेक्षा हिंदूंच्या दैवाचा दुसरा दुर्विपाक तो कोणता ? इज्जत उरली