अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 201

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ १५७

नाहीं, मान उरला नाहीं, त्राण राहिला नाही व प्राण जाण्याची वेळ जवळ आली असतां देखील केवळ आत्मसंरक्षणाचा उपाय म्हणून तरी आपल्या स्वधर्मबांधवांस

जवळ करण्याची बुद्धि या हिंदु महासभेस होऊं नये म्हणजे नवल नव्हे

काय ? इतर राष्ट्रे मेली पण आमच्या वर्णाश्रम धर्मामुळे आम्ही जंगलों अशी फुशारकी मारणाऱ्या लोकांनी आपण

जगलो ते कसे जगलों

याचा कधी विचार केला आहे काय ? जगण्याचे अनेक मार्ग आहेत पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असें नाहीं. शत्रू आला असतां त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणें हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेंच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटीवर जगणें हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेलें असतां जगणें होतेच. पण एका परीचे जगणे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचें जिणे आहे. दुसरे किड्याचें जिणें आहे. पण धर्माच्या अतिरेकानें वेडावलेल्या लोकांना हा शूरांचा धर्म सांगून काय उपयोग ? नरकांतल्या किड्याप्रमाणे ज्यांनी हजारों वर्षे घालविली त्यांना मानवाच्या जिण्याची काय चाड आहे ? धर्माच्या नांवावर अस्पृश्यतेसारखी अनेक सामाजिक अन्यायांची टेंगळे व गळवें हिंदु जनांच्या अंगावर वाढलेलीं आहेत. व त्यामुळे हिंदु संस्कृतीचें आणि हिंदूंच्या चारित्र्याचे स्वरूप कोणा त्रयस्थांला साहजिक ओंगळ आणि हिडिसवाणें दिसतें. इतकेंच नव्हे तर अस्पृश्यतेच्या सामाजिक अन्यायाचें गळुं डोंगराएवढें वाढलें असून त्याच्या पायीं हिंदु समाज आजवर कण्हत कुंथत कसा बसा मार्ग कंठीत होता. पण आतां हें गळूं इतकें बळावलें आहे की हिंदु समाजाच्या हृदयाच्या प्राण क्रियेला देखील त्याची कळ पोहोचून हिंदु समाज मरून पडण्याची वेळ आली आहे. अशा काळी हैं गळू फोडून टाकण्यासाठी कोणीतरी हाती नस्तर घेणें अवश्य होतें : पण जेथें स्वत: वैदूलाच Tad झाली आहेत आणि नस्तर चालविलें असता आपलीच धार्मिक धमनी दुखवली जाईल, असें ज्याला भय वाटतें तो वैदु समाजावर ARR चालविण्यास कसा तयार होईल ! हिंदु महासभा ही पं. मदन मोहन मालवीया सारख्या महत्वाकांक्षी ब्राह्मण्यग्रस्त भिक्षुकांची संस्था आहे. जोपर्यंत ती त्यांच्या कक्षेत आहे तोपर्यंत अस्पृश्यता निवारणार्थ ती कांहीं करील अशी आशा धरणें व्यर्थ आहे. हिंदु महासभेच्या निष्क्रियतेबद्दल आम्हांस उदास वाटत नाही. कारण तिची आम्हांस केव्हांच आस नव्हती. हिंदु महासभा अस्पृश्यता निवारणात कांहीं करणार नाहीं असे जरी आम्हांस वाटत होतें तरी ती अस्पृश्यतेच्या दृढीकरणास कारणीभूत होईल असें आम्हांस केव्हांच वाटलें