अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 202

१५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नव्हतें. पण तसेंच एक खेदकारक कृत्य मुंबई प्रांतिक हिंदु महासभेच्या माटुंगा शाखेच्या हातून घडण्याचा कुयोग जवळ येऊन ठेपला आहे. हिंदु महासंभेच्या माटुंगा शाखेने नुकतेंच एक विनंती पत्र काढलें आहे. त्यांत माटुंगा येथें हिंदु महासभेतर्फे एक देऊळ बांधण्यात येणार आहे असें जाहीर केलें आहे. व त्या कामी जनतेनें त्यांस द्रव्यद्वारा मदत करावी अशी मागणी करण्यांत आली आहे. मुंबई शहरांत हजारों देवळें असतांना हिंदुमहासभेनें आहेत त्यांत आणखी भर टाकावी याबद्दल कोणाही समंजस माणसास खेदच वाटेल. पण पत्रकांत देऊळ बांधण्याचा जो हेतु दिला आहे तो वाचून तर हिंदुसमाजाचें ऐक्य चितणारा कोणीही माणूस भांबावून गेल्याशिवाय राहणार नाही. हें नवें देऊळ बांधावयाचा हेतु असा कीं, जुन्या देवळांचा धर्म अगदी विपरित आहे. अस्पृश्यांसारख्या देवदर्शनास भुकेलेल्या लोकांना ती आंत घेत नाहींत व देवाकडे ढुंकून न पाहणाऱ्या लोकांकरितां ती सदोदित खुली असतात. माटुंगा येथें बांधण्यात येणाऱ्या देवळाचा धर्म यापेक्षां निराळा असणार. तें स्पृश्य व अस्पृश्य यांना सारखेंच खुले राहणार आहे.

नव्या धर्माचें नवें देऊळ

हीं कल्पना छानदार आहे. पण अस्पृश्यता निवारणाचा नवा उपाय म्हणून जर तो अस्तित्वांत येत असेल तर त्याच्यापासून खरें अस्पृश्यता निवारण न होतां अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ मात्र होईल असें आम्ही स्पष्टपणें म्हणतों. ज्याच्या मनांत ही कल्पना उद्‌भवली त्यांना एकतर अस्पृश्य लोक हिंदूंच्या देवळांत जाण्याचा इतका आग्रह कां धरितात हें पुरतेपणी लक्षांत आले नसावें. किंवा नव्या धर्माचीं नवीं देवळें बांधल्यानें अस्पृश्यतेचा प्रश्‍न सोडविला जाईल असे तरी त्यांस वाटलें असलें पाहिजे. अस्पृश्यांतील जे लोक देवळांत जाण्याचा प्रयत्न करित आहेत ते केवळ अस्पृश्य लोक देवदर्शनावांचून तडफडताहेत म्हणून नव्हे. खऱ्या तत्वाचे शोधन करण्यासाठी चिकित्सकपणाची टाकी घेऊन भिक्षुकशाहीनें रचलेल्या पौराणिक कथांच्या डोंगराच्या कपच्या कपच्या उडविणारे बुद्धिप्रधान लोक अस्पृश्यांत आहेत. ते दगडाच्या देवाला आलिंगन देण्यासाठी साऱ्या अस्पृश्य वर्गास आपलें सर्वस्व खर्च करण्यास सांगतील असे मानणे हे अज्ञानपणाचें लक्षण आहे. अस्पृश्यांना देवळांत जावयाचे आहे ते केवळ त्यांना स्पृश्यांच्या बरोबरीने आपला हक्क बजावावयाचा आहे म्हणून. ज्या कोणास या बाबतीत कांहीं प्रयत्न करणें असेलं तो त्यानी या दिशेने करावा. निराळी देवळें बांधण्याच्या भरीला पडूं नये. त्यानें अस्पृश्यांची तर तृप्ती व्हावयाची नाहीच पण त्यानें अस्पृश्यताही जावयाची नाही. निराळी व्यवस्था करण्यानें जर अस्पृश्य