अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 203

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ १५९

लोक स्पृश्य होते तर महारवाडे, मांगवाडे, चांभारवाडे व ढोरवाडे हे आज अनादिकालापासून वेगळेच आहेत. त्याचा परिणाम काय झाला आहे याचें जागती ज्योत उदाहरण डोळ्यापुढे असतां निराळें देऊळ बांधल्यानें अस्पृश्यता निवारण होईल असे म्हणणे शुद्ध पोरकटपणा नव्हे काय ? या पोरकट लोकांनी अस्पृश्यता निवारणाचा जो पोरखेळ चालविला आहे त्यांत निराळी देवळें, निराळ्या विहिरी, हें अस्पृश्यता घालविण्याचे उपाय आहेत म्हणून सांगण्यांत येतें. नशीब बिचाऱ्या अस्पृश्यांचे, की त्यांच्यासाठी निराळे रस्ते, निराळ्या ट्रामगाड्या, निराळ्या आगगाड्या, आगबोटी व मोटारी, निराळी कोर्टे व कचेऱ्या सुचविण्यांत येत नाहींत !

या निराळया देऊळवाल्यांची अशी एक शक्कल आहे कीं, नवीन देवळें स्पृश्य व अस्पृश्य या दोहोंसही खुलीं राहणार असल्याकारणानें ती संयुक्त देवळें होतील. व तेथे स्पृश्य व अस्पृश्यांची मिळणी झाल्यानें अस्पृश्यता नाहिंशी होण्याच्या मार्गाला लागेल. या शक्कलबाज लोकांस आम्ही असें विचारतों की, स्पृश्य लोक येतीलच अशी हमी कोण घेतो ? साऱ्या मुंबईत हिंदु महासभेचे देवळाशिवाय हिंदूंना दुसरे देऊळच नसतें तर अस्पृश्यांना खुलें केलेल्या देवळांत स्पृश्यलोक निरुपायास्तव येतील असें मानतां आलें असतें. पण तशी स्थिती नाहीं. जेथें घरांपेक्षां देवळें जास्त आहेत तेथें अनेक शुद्ध देवळें सोडून बाटग्या देवळांत स्पृश्य लोक येतील असें म्हणणारांना [आम्ही ] [असें ] [सुचवितो ] [की ] [नवे ] [देऊळ ] बांधून हा अनुभव विकत घेण्याची कांही जरूरी नाहीं. मुंबईत अस्पृश्यांपैकी चांभार लोकांचे एक विठोबारुक्माईचें देऊळ आहे व [त्यांत ] [स्पृश्य ] [लोकांना ] [पुजेस ] जाण्यास कोणाची हरकत नाही. पण आज वीस वर्षाच्या अवधीत स्पृश्य जातीने त्याचा उपयोग केल्याचे आमच्या ऐकिवांत नाही. निराळें देऊळ बांधल्याने चांभारलोक स्पृश्य तर झाले नाहीतच पण बिचारा [पांडुरंग ] [आपल्या ] [रुक्मिणीसह ] अस्पृश्य मात्र झाला. हाच प्रकार हिंदुमहासभेच्या देवळाचा होणार [याबद्दल ] आमच्या मनांत बिलकूल शंका नाही.

निराळी देवळें हा प्रथमदर्शनी स्पृश्य व अस्पृश्यांमधील एकीकरणाचा मार्ग आहे असे दिसलें तरी अखेर त्यापासून दुराकरण होणार आहे यांत कांहीं संशय नाही. निराळी व्यवस्था करणे हा नड भागविण्याचा मार्ग आहे तो अस्पृश्यता निवारणाचा मार्ग नव्हे. अस्पृश्यता निवारणाचा मार्ग म्हणजे आहेत त्या सर्वाजनिक व्यवस्था सर्वांना खुल्या करणें हाच होय,