१६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
दुसरें सर्व मार्ग झूट आहेत
पण हा मार्ग हिंदु महासभेच्या चालकांना केव्हांच पटणार नाही. हिंदु महासभाही भिक्षुकशाहीची सुधारलेली आवृत्ति आहे. ज्या भिक्षुकशाहीनें आपले वैशिष्ट्य कायम राखण्यासाठी तनमन वेंचलें व हिंदु हिंदुत वर्णभेद, संस्कारभेद, मंत्रभेद, तंत्रभेद, इत्यादि प्रकारचा दुजेपणा माजविला ; इतकेच नव्हे तर, तो दुजेपणा मोडून हिंदु समाजास एकरुपी करणारांवर अनेक वेळां ग्रामण्यें केलीं त्या भिक्षुकशाहीला निराळे देऊळ बांधण्याचा मार्ग सुचावा हे तिच्या नेहमीच्या वादास धरूनच आहे. निराळया देवळाच्या कल्पनेत स्वत:चा सोवळेपणा कायम ठेवून अस्पृश्यांच्या तोंडावरून हात फिरविण्याचा मतलबी कावा आहे हे अस्पृश्य लोक ओळखून आहेत. या मतलबी लोकांस आम्ही असे सांगतों की, आमचा देवळांत प्रवेश होण्यास अवधी लागला तरी त्याला आमची हरकत नाहीं. पण केवळ अवधी लागतो म्हणून निराळी देवळें आम्हांस नकोत. बंद असलेली देवळे आम्ही केव्हां तरी खुली करून घेऊ. पण तुमचें एक निराळं देऊळ आम्हांला लाभले तरी त्या एकामुळें देवळें आज आम्हांस बंद आहेत ती केव्हांच खुली होणार नाहींत व आमची अस्पृश्यता आहे तशीच राहील.
हा बुद्धिवाद हिंदुमहासभेस पटो वा न पटो, पण मुंबई येथील डिप्रेस्ड इंडिया
SARA तरी पटला पाहिजे होता. पण तसे दिसत नाहीं. ही संस्था
अस्पृश्य वर्गाची आहे. या संस्थेचा उगम वर्हाडांत झाला आहे व तेथें तिचें मुख्य ठाणें आहे. मोठ्या बायाप्रमाणे संचार करीत करीत ती मुंबईत येऊन दाखल झाली व येथें तिनें आपली एक शाखा उघडली आहे. तिचे चालकत्व ज्या भोसले नांवाच्या इसमाकडे सोंपिवण्यांत आलें आहे त्याच्यांत संस्था चालविण्यास अवश्य असणारी फंडगिरी ओतप्रोत आहे. दाकी या संस्थेच्या कार्यकारी मंडळीत जबाबदार लोकांची अशी वानवाच आहे. कांहीं जोगडे, कांही गंजड, कांही अर्ध शिकलेले महत्वाकांक्षी, कांही पोटभरू आणि मानास हापापलेले पण HIST थारा नसलेले असे अस्पृश्यांतील कांहीं लोक व स्पृश्यांतील सनातनधघर्मी आणि ' लब्धप्रति।ष्ठित, तें खपवून घेणारे वावदूक या उभयतांच्या जुळणीनें हिचा कारभार चालतो. खोटें जाहीर करण्याला तर ती केव्हांच डरत नाही. आणि धडधडीत संस्थेचे अध्यक्ष यांच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांना एक सांगून दुसरेच करण्यास तिला कांहींच वाटत नाहीं. यावरून या संस्थेच्या कामावर किती विश्वास ठेवावा हें कोणीही सांगू शकेल. अशा संस्थेच्या हातून अस्पृश्यांचे कल्याण होईल असें ज्यास वाटत असेल त्यास खुशाल वाटो. आम्हांस तसें मुळींच वाटत नाहीं. या संस्थेने आज कांहीं दिवसांपासून मुंबईत अस्पृश्य वर्गासाठी एक मंदीर बांधण्याचा