अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ - Page 205

अस्पृश्यता निवारणाचा पोरखेळ १६१

उपक्रम चालविला आहे व त्यासाठी चार आण्याची डोईपट्टी एक स्वयंसेवकांचा तांडा लावून वसूल करण्यांत येत आहे. अस्पृश्य लोक स्पृश्यांच्या देवळांत शिरण्याचा प्रयत्न करीत असतां जी संस्था निराळीं देवळें बांधण्याचा उपक्रम करते ती संस्था म्हणजे एक मूर्खांचा कंपू आहे, असे म्हणण्यास काय हरकत आहे ? अशा लोकाना फांसावर दिलें तरी ते कार्य पुण्यप्रदच ठरेल इतके हें निंद्यकृत्य आहे. अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नति करण्याचें काम इतकें अफाट आहे की त्यासाठी हजारों संस्था जरी निघाल्या तरी त्या हव्यात पण अशी बेवकूब कामें हाती घेणाऱ्या संस्था नसलेल्या पत्करल्या. त्यांच्यापासून समाजाचा कांही लाभ तर नाहींच पण उलट तोटा मात्र होतो. तेव्हां अशा विघातक संस्थांपासून अस्पृश्य बंधूंनी दूर रहावें यांतच त्यांचे कल्याण आहे ; नाहीं तर परके लोक जसा अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा पोरखेळ करीत आहेत तसा ते आपल्या कार्याचा

आपणच पोरखेळ करून घेतील. व त्यापासून होणाऱ्या आत्मघाताच्या पापाचें

त्यांना धनी व्हावें लागेल.

ee

a लवन्नवेनाले

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता ३ जून १९२७.

` डब्ल्यू-२०७३-११ अ