३५
जातिभेदाची इमारत उध्वस्त करण्यासाठी
प्रथमत: बेटीबंदीवरती गदा घातली पाहिजे
पंडित मदनमोहन मालवीय यांना आपला प्रांत सोडून प्रकृतीच्या स्वास्थासाठीं बेंगलोर मुक्कामीं जावें लागलें आहे, व हल्ली ते म. गांधीबरोबर रहात आहेत. बेंगलोरला जातांना त्यांनी वाटेंत कांही दिवसांकरितां म्हैसूर येथें मुक्काम केला होता. म्हैसूर मुक्कामी असतांना त्यांचा व जुन्या शास्त्रीपंडितांचा अस्पृश्यतानिवारणासंबंधीं मोठा वादविवाद झाला. त्यांत मालवीयांचा विजय झाला, असें TATA जाहीर झालें आहे. पराभूत झालेले शास्त्रीपंडित स्तब्ध न बसतां पं. मालवीय यांच्या सांगण्याप्रमाणे अस्पृश्यतानिवारणाच्या कार्यास लागले आहेत हें वाचून बरेच लोक पं. मालवीय यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतींत जे श्रम केले आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत असतील. परंतु या सर्वांवर विरजण पडावें म्हणूनच कीं काय त्यांचे व्याही रा. लक्ष्मीकांत भट यांनीं पं. मालवीय यांची एक अंदरकी बात चव्हाट्यावर आणली आहे. रा. लक्ष्मीकांत भट यांची मुलगी पं. मदनमोहन यांच्या मुलास दिलेली आहे. या मुलीशिवाय रा. भट यांना दुसरी एक गुलगी आहे. परंतु घरच्या गरीबीमुळें या मुलीस स्वजातींतील वर मिळणें कठीण झालें. यास्तव रा. भट यांना आपल्या मुलीस परजातींतील एका बॅरिस्टरास देणें भाग पडलें. या कृत्यांत सुधारणेची कांस धरलेले आपले व्याही पं. मालवीय आपणास साहाय्य करतील असें रा. भट यांस वाटलें असावें. पण झाला तो प्रकार अगदीं अपेक्षेच्या उलट झाला ! हा मिश्रविवाह झाल्याबरोबर गंगातीरीं पं. मालवीय यांच्याच अध्यक्षतेखाली एक जातीची सभा भरविण्यांत आली. त्या सभेंत रा. भट यांस वाळीत टाकण्यांत आलें. व सर्व प्रकारचा जातिसंबंध तोडून टाकण्यांत आला. हा प्रकार झाल्यानंतर लौकरच रा. भट यांच्या मातोश्री निवर्तल्या. त्या प्रसंगी पं. मालवीय याच्या घरीं पुनः पंचायत बसविण्यांत आली ; व जो कोणी रा. भट यांच्या मातोश्रीच्या शवाला खांद घालून घाटावर जाईल त्यास समाजबाह्य करण्यांत येईल, असा ठराव पसार करण्यांत आला ! त्यामुळें रा. भट यांच्या मातुश्रीच्या स्मशानयात्रेस त्यांच्या जातभाईपैकीं कोणींच आलें नाहीं. तद्नंतर रा. भट त्यांच्या पत्नि दुखण्यानें आसन्नमरण असतांना आईची व मुलीची शेवटची भेट व्हावी म्हणून रा. भट यांनी आपल्या मुलीस म्हणजे पं. मालवीय यांच्या सूनबाईस माहेरी पाठवावे, अशी विनवणी
डब्ल्यू-२०७३-११ ब '