जातिभेदाची इमारत उध्वस्त . . . . . बेटीबंदीवरती गदा घातली पाहिजे १६३
केली. परंतु अस्पृश्यांसाठी fed गाळणाऱ्या पंडितजींच्या हृदयाला मूळीच पाझर फुटला नाही | इतकेच नव्हें तर पं. कपीलदेव मालवीय व सत्यनारायण मालवीय यांनी रा. भट यांच्याशीं व्यवहार ठेवल्यामुळे त्यांनाहि बहिष्कृत करण्यांत आलेलें आहे ! हा सर्व प्रकार पाहून रा. भट हे अगदी भांबावून गेलेले आहेत, व आपले व्याही पं. मालवीय बोलतात काय आणि करतात काय याचें सखेद आश्यर्य वाटून हिदूमहासभेसारख्या 4 संस्थेस चालना देणाऱ्या मालवीयजींनीं हिंदुसमाज- संघटनेसंबंधी आपलें खरें मत काय हें एकदांचे जाहीर करावें, असें त्यांस आव्हान केलें आहे. लाला लजपतराय हे सामाजिक व राजकीय बाबतींत सारख्याच प्रमाणांत जहालपणा प्रतिपादणारे पुढारी म्हणून त्यांचा एकेकाळी लौकिक असें. पण अलीकडे त्यांना सामाजिक सुधारणेचा तीव्रता विशेषशी भासत नाहीं हें ज्यांनीं त्यांची अलीकडील कारकीर्द चोखाळून पाहिली असेल त्यांना विशद करून सांगण्याची जरूरीं नाहीं. अस्पृश्यतेला नसता भेसूर रंग देण्यांत येतो, ब्राह्मणेतर चळवळ राष्ट्रविघातक आहे, वगैरे वगैरे जीर्णमतवाद्यांचे विचार त्यांचे तोंडून निघाल्याचे सर्वश्रुत आहेच. असें असूनहि लाला लजपतराय यांना देखील पं. मालवीय यांच्या वर्तनाबद्दल अचंबा वाटत आहे, व रा. भट यांनीं केलेली विधानें खरीं असल्यास पं. मालवीय यांनीं हिंदुमहासभेपासून आपला संबंध तोडून टाकावा असा अभिप्राय त्यांच्या “पीपल्स” नांवाच्या पत्रांत त्यांनी दिला
आहे. खरें म्हटलें असतां स्वामी श्रद्धानंद यांनीं जेव्हा हिंदुमहासभेचा राजिनामा दिला त्याच वेळीं त्यांचा राजिनामा न घेतां पं. मालवीय यांचीच हिंदुमहासभेंतून हकालपट्टी करावयास पाहिजे होती. पण वेळोवेळी अस्पृश्यतेसाठी नक्राश्रू गाळून लोकांची फसवणूक झाल्यामुळे हिंदुसंघटनेच्या बाबतींत हिंदुमहासभेस पंडितजीनें लुली केली आहे हें कबूल करण्यास बऱयाच लोकांस धैर्य होत माहीं. आतां तरी हिंदुसमाजाचें संघटन व्हावें अशी ज्यांची मनापासून इच्छा असेल त्यांनीं अशा ढोंगी माणसांच्या हातून हिंदुमहासमेची सुटका
करावी. त्याशिवाय गत्यंतर नाहीं.
A मोर्लेमिंटो सुधारणामुळे वर्चस्व प्राप्त झालेल्या मुसलमानांच्या विरोधात प्रथमतः पंजाबात हिंदुसभेची स्थापना झाली. फेरोजपूर येथे १९१४ साली झालेल्या सभेच्या ६ व्या अधिवेशनात अखिल भारतीय स्तरावर हिंदुसभा स्थापन करण्याचा विचार निश्चित झाला. कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वार येथे १९१५ ला कासिमबजारचे महाराज सर महिद्रचन्द्र नंदी यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुमहासभेचे पहिले अधिवेशन झाले. विषयनियामक समितीत पं. मदन मोहन मालवीय, लाला FARM, मोतीलाल घोष, लाला हंसराज, सर तेजबहादूर सप्रू, म. गांधी हे पुढारी व नारायण मोरेश्वर पटवर्धन या नावाचे एक महाराष्ट्रीय गृहस्थही होते.