३६
हिंदु-मुसलमानांची तेढ मिटविण्यास उपाय
हिंदु व मुसलमान यांच्यांत आजकाल जीं रणें माजून राहिलीं आहेत त्यांना आळा कसा घालतां येईल याबद्दल आज सर्वत्र विचारविनिमय चालू आहे. परंतु कोणत्या प्रकारचा उपाय योजिला असतां गुण येईल याची खात्री कोणी देऊं शकत नाहीं. हा प्रश्न इतक्या भानगडीचा कां व्हावा याचा पूर्णपणें विचार केला असतां असें दिसून येतें कीं, हिंदु व मुसलमान यांचा संबंध कोणत्या प्रकारचा आहे याचें खरें स्वरुप लोकांच्या ध्यानात पूर्णपणें आलेलें दिसत नाहीं. हिंदु व मुसलमान यांच्यांतील नात्यागोत्यास कोणी कसल्याहि नांवानें संबोधिलें तरी तो संबंध एक प्रकारचा जातिभेदच आहे असें आमचें मत आहे. रोटीबंद, बेटीबंद हीं जातिभेदाचीं मुख्य लक्षणें आहेत. यावरून पाहतां जसा ब्राह्मण व मराठा यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तसा ब्राह्मण व मुसलमान यांच्यांतहि होत नाही. ब्राह्मण व मराठा हा जर जातिभेद आहे तर हिंदु व मुसलमान हा देखील जातिभेद आहे, असेंच मानिलें पाहिजे. हा मुद्दा एकदां मान्य झाला म्हणजे हिंदु मुसलमानांची तेढ मिटविण्यास कोणता उपाय योजावा याविषयीं पंचाईत पडणार नाही. कारण हिंदुतील जातिभेद मोडण्यास जो उपाय सांगितला जातो तोच उपाय हिंदु मुसलमानांतील भेद मोडण्यास अमलांत आणला पाहिजे. जातिभेद मोडण्यास जसा मिश्रविवाह होणें अवश्य आहे तसा हिंदु मुसलमानांतील जातिभेद मोडण्यास त्यांच्यांतहि मिश्रविवाह झालेच पाहिजेत. हें मत आमचेंच नसून डॉ. रवींद्रनाथ टागोर ade पण तेंच मत आहे. अशा दृष्टीनें पहातां, कु. मालिनीबाई पाणंदीकर, बी. ए.,बी.टी. या हिंदु मुलीचा गुलाबखान बशिरुद्दीनखान बी. ए., बी. टी. या मुसलमान गृहस्थाबरोबर झालेला विवाह अत्यंत महत्वाचा आहे. कु. मालिनीबाई या हिंदु समाजांतील सारस्वत जातीपैकी असून पु. लो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नात होत. या कामीं मालिनीबाईनी जो धीर दाखविला तो त्यांना साजेसाच आहे. त्यांचा जन्मच पुनर्विवाहित दांपत्याच्या पोटी झालेला आहे. त्यांच्या मातोश्री व त्यांचे वडील रा. पाणंदीकर यांचा विवाह हा महाराष्ट्रांतील पहिलाच पुनर्विवाह होय. अर्थात् माशांच्या पिल्लांना ज्याप्रमाणे पोहावयास शिकवावें
† पाहा, परिशिष्ट क्रमांक ११.