हिंदु-मुसलमानांची तेढ मिटविण्यास उपाय - Page 210

१६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लागत नाहीं, त्याचप्रमाणें मालिनीबाईला सुधारणेची शिकवण देण्याचें कांहीं कारण नाहीं. तसें जर नसतें तर मालिनीबाईनीं ही सामाजिक सुधारणेंतील अगदीं लांबची उडी घेतलीच नसती.

हिंदु मुलसमानांतील भेदाभेद नष्ट होण्यापुरताच अशा मिश्रविवाहाचा फायदा आहे असें नाही. हिंदुमहासभेला प्रिय असलेल्या शुद्धीकरणाच्या दृष्टीनेंहि त्यास महत्त्व आहे. मालिनीबाई मुसलमानांच्या गोटांत गेली असें म्हणून तिचा उपहास करणारा एक पक्ष निर्माण झाला आहे. या पक्षाची समजूत अशी आहे कीं, गांधर्व विवाह असो किंवा ब्राह्म विवाह असो, त्यांत वरपक्षाचा वरचढपणा नेहमींच राहणार. अशा स्थितींत मालिनीबाइचें गुलाबखान यांच्याशीं एकदां लग्न होऊन गेल्यावर पुढें मागें मालिनीबाईनें कुंकु लावूं नये व हिंदु पद्धतीचा पोषाख करूं नये अशी जर खानसाहेबांची लहर लागली तरं पुढें काय ? परंतु वरपक्षाचा नेहमींच वरचढपणा राहतो असें कशावरून ? कोटुंबिक कार्यक्रमाच्या चरकांत सांपडल्यावर वधुपक्षाचें वरपक्षावर कांहींच चालत नाहीं, असें म्हणणें सत्यास धरून होईल असें आम्हांस मुळींच वाटत नाही. फार दूर कशाला ? हिंदुंतील पुरुषवर्गाला अमूक एक सामाजिक सुधारणा तुम्ही कां घडवून आणीत नाहीं, असा प्रश्‍न केला असतां, 'बायकांपुढे आमचें कांहीं चालत नाहीं, असा उघडा जबाब मिळतो. यापेक्षा वधुपक्षाच्या वरचढपणाचा दुसरा पुरावा कोणता पाहिजे ? आम्ही तर असें म्हणतों कीं, या विवाहापोटी मालिनीबाईवर हिंदु पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येण्याऐवजी खानसाहेबावरच मुसलमान पद्धतीचा त्याग करण्याचा प्रसंग येईल. हा केवळ तर्क नसून त्याला ऐतिहासिक पुरावा देतां येण्यासारखा आहे. हिंदु मुसलमानांतील हा कांही पहिलाच विवाह नव्हे. या पूर्वी मोंगल बादशहांनीं हिंदु मुलीशीं विवाह केल्याची अनेक उदाहरणें आहेत. . परंतु त्या मिश्रविवाहांत मोंगल बादशहाच हिंदु झाले, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. कारण वधुपक्षाच्या वरचढपणामुळें उदारमतवादी अकबरबादशहा पासून पुढें कोणाहि मोंगल बादशहाची-नव्हे, कडव्या औरंगजेबाची सुद्धा सुंता झाली नव्हती ! असाच परिणाम मालिनीबाईच्या लग्नाचा होणार नाहीं कशावरून ? आणि असें जर झालें तर हिंदूंच्या गोटांतून एक बाई गेली, असा शोक करण्याची हिंदु... समाजावर पाळी येण्याऐवजी मुसलमान समाजांतून एक पुरुष हिंदु स्त्रीच्या प्रेमरज्जुने बद्ध होऊन आपल्या समाजात आला म्हणून त्यास आनंद होईल. आतां या दोहोंपैकी परिणामी कोणती गोष्ट घडून येईल, हें सर्वस्वी हिंदु समाजाच्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. हिंदु समाजानें या दांपत्यास जर सहनशीलतेनें वागवून हिंदू समाजांत मोडण्यास अवसर दिला तर या मिश्रविवाहाचा परिणाम