हिंदु-मुसलमानांची तेढ मिटविण्यास उपाय - Page 211

हिंदु-मुसलमानांची तेढ मिटविण्यास उपाय १६७

खानसाहेबांच्या हिंदुकरणांत होईल. उलट जर त्यांचा छळ करण्यांत आला तर त्याचा परिणाम मालिनीबाईच्या मुसलमानीकरणांत होईल. gear परिणामी दुसरीच गोष्ट घडून आली तर त्यांत मालीनीबाईचा दोष न होतां हिंदुसमाजाचाच दोष होईल. कांहीहि झालें तरी मालिनीबाईनें हिंदु समाजाची ध्वजा परधर्माच्या मोहल्ल्यांत रोवून पर्यायाने हिंदु महासभेच्या शुद्धीच्या कार्यास मदत केली, याबद्दल हिंदुधर्माची वाढ व्हावी असें इच्छिणारा दरेक हिंदु त्यांचे अभिनंदनच करील. ज्या युवतींनें एवढें धैर्य दाखविलें तिचा बाप अगदी जहाल सुधारक असेल असा समज कोणाचा झाला असतां तर त्यांत कांही आश्चर्य वाटण्याजोगें नाही. पण मालिनीबाईची धडाडी तिचे वडील रा. पाणंदीकर यांच्यांत मुळीच नाहीं असे मोठ्या कष्टानें आम्हास म्हणावें लागते. ता. २२ मेच्या “विविधवृत्तांत” अस्पृश्यतानिवारण या मथळ्याखाली रा. पाणंदीकर यांचे अस्पृश्यता निवारणावर कांही स्फुट विचार प्रसिद्ध झाले आहेत. ते वाचून कोणाचीहि निराशा झाल्यावांचून राहणार नाहीं. रा. पाणंदीकर लिहितात” अस्पृश्यता निवारण्याचे जे अनेक उपाय माझ्या मतें फलद्रूप होऊं शकतील ते संक्षेपाने मी खाली नमूद करतों. (१) शास्त्रतःच आम्ही अंत्यज आहोंत, ही जी अस्पृश्य समाजाची दृढमूल समजूत, ती हळूहळू दूर केली पाहिजे. (२) या अस्पृश्य वर्गातील आपापसांतील अस्पृश्यता अगदीं पहिल्यानें दूर केली पाहिजे. (३) विरोधभाव जागृत न करितां जे जे हक्क प्राप्त होतील त्यांचा उपकारबुद्धीनें गाजाबाजा न करितां फायदा करून घेतला पाहिजे. (४) स्वच्छ अंग व स्वच्छ कपडे वापरण्याची संवय संपादन केली पाहिजे. (५) चांगल्या शिक्षणाचा फायदा करून घेतला पाहिजे. या कामी या वर्गाकरितां स्वतंत्र शाळा स्थापन केल्या पाहिजेत. इतर वर्गाच्या शाळांतूनच आम्हांस शिक्षण मिळालें पाहिजे, हा आग्रह सोडून दिला पाहिजे. कारण या आग्रहाने निष्कारण विरोधभाव मात्र उत्पन्न होतो. याप्रमाणे क्रमशः सुधारणा घडवून आणल्या म्हणजे अस्पृश्यता सहज निघून जाईल असा भरंवसा वाटतो.” रा. पाणंदीकर यांनी “पुष्कळ अनुभवाने व दीर्घमनाने” जे उपाय शोधून काढले आहेत ते ज्यांनी पुण्याचे भोपटकर, माटे, केसरीकार आणि त्यांच्या कंपूंतील लोक यांचे या बाबतींतले लेख वाचले असतील त्यांना त्यांत कांही नवें आहे असें वाटणार नाहीं. त्यांतील बऱ्याच मुद्याचे यापूर्वी बहिष्कृत भारतांतून खंडण केलेलें आहे. तेव्हा त्यांच्या फोलपणाबद्दल आणखी लिहिण्याची जरूरी नाहीं. एकाच गोष्टीचा आम्हास विस्मय वाटतो. ती गोष्ट ही कीं, रा. पाणंदीकरांसारख्या सुधारकाने अस्पृश्यतानिवारणाच्या बाबतींत धार्मिक मनोवृत्ती न दुखवतील अशी खबरदारी घेण्यास सुचवून लोक आपखुशीनें ज्या थोड्या हक्काच्या तुकड्यांची मेहेरबानीनें भिक्षा घालतील त्याबद्दल त्यांचे पुष्कळसे आभार मानून भांडण न करतां