३८
स्पृश्याँतील स्वार्थसाधु अस्पृश्यांच्या वाटेला जाणार
नाहीत, तर त्यांच्यात फूट पडणार नाही
“ स्वधर्म “ पत्राच्या ता. ९ जूनच्या अंकांत महाडच्या पाणी प्रकरणावर एक अग्रलेख लिहिण्यांत आला आहे. हे प्रकरण घडून २॥-३ महिने लोटल्यावर यासंबंधीं कोणी कांहीं लिहील असें आम्हांस मुळींच वाटलें नव्हतें. कधीच नाही त्यापेक्षां उशिरा कां होईना या न्यायाने स्वधर्मकारानीं या बाबतींत आपली लेखणी चालविली हें योग्यच झालें. कारण " स्वधर्म “ पत्र म्हणजे डॉ. कूर्तकोटीच्या Ford मुखपत्र होय. डॉ. कूर्तकोटी म्हणजे हिंदु धर्माचे जगद्गुरू. त्यांच्या पत्रानें जर महाड प्रकरणाचा खल करूं नये तर मग कोणत्या पत्रानें तो करावा ? इतक्या SRRA होत असलेलीं ही चर्चा निर्दोष होईल अशी अपेक्षा करणें अगदीं साहजिक होतें. पण स्वधर्मकाराच्या चर्चेचा प्रकार अगदींच विपरीत दिसतो. carson लिहितात, “ हा दंगा झाल्यानंतर त्या संबंधी ज्या निरनिराळ्या हकीकती प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी पुणे हिंदू सभेंनें जी प्रसिद्ध केली ती आम्हीं विशेष विश्वसनीय मानतों, कारण अस्पृश्योद्धारार्थ आजन्म खटपट करणाऱ्या माणसांनी व अस्पृश्योद्धाराचेंच काम करणाऱ्या संस्थेकडून, मुद्दाम महाडपर्यंत जाऊनयेऊन ती प्रसिद्ध केलेली आहे.. बॅ. आंबेडकरांची हकीकत वस्तुतः सवपिक्षां विश्वसनीय धरावयास पाहिजे होती; व तसेंच आम्हीं केलें असतें, परंतु त्यांनी दिलेल्या माहितीचा प्रत्यक्षाशीं विरोध येत असल्यामुळें व ती देतांना कोणाहि निःपक्षपाती माणसाला सहज ओळखून येईल, असा जातिद्वेष भरलेला असल्यामुळें त्यांची माहिती पुराव्याला धरता येत नाहीं. “ आमची बातमी स्वधर्मकार पुराव्याला धरीत नाहींत. यांत आम्हांला विशेष नवल वाटत नाहीं. जातिभेदामुळें हिंदुस्थानांतील न्यायदानपद्धती किती मलीन झालेली आहे याचा अनुभव आम्हांस नित्याचा आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद सुरू झाल्यापासून तर न्यायाधीश आपल्या जातीवर जाईल या भयाचें भूत या प्रांतांत पक्षकारांपुढे कायमचें नाचू लागले आहे; आणि म्हणून आमचा दावा या न्यायाधिशाकडून कादून दुसरा कोणातरी परधर्मीय न्यायाधिशाकडे द्यावा, अशा प्रकारचे अर्ज हायकोर्टाकडे सतत करण्यांत येतात. स्वधर्मकारांनीं माटे यांनीं प्रसिद्ध केलेली हकीकत मान्य करण्यांतही हिच हीन मनोवृत्ति व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा