स्पृश्यांतील स्वार्थसाधु अस्पृश्यांच्या वाटेला जाणार नाहींत, तर त्यांच्यात फूट पडणार नाही. - Page 216

१७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पक्षपात करणें हें शंकराचार्याच्या मुखपत्रास शोभतें कीं नाहीं, याचा विचार स्वधर्मकारांनी अवश्य करावा. कारण माट्यांची महाडची हकीकत सपशेल खोटी आहे असें आम्ही गेल्याच्या मागील अंकांत सिद्ध करून दिलें होतें. त्यांत महाड म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. टिपणीस यांजविषयी केलेल्या विधानाचा खोटेपणा आम्ही माट्यांच्या पदरांत घातला होता. आज माट्यांच्या दुसऱ्या एका विधानाचा असत्यपणा आम्ही सिद्ध करून देत आहों. रा. माटे यांनीं आपल्या हकीकतींत असें प्रसिद्ध केलें होतें की, एका बाईवर हात टाकल्याची जी गोष्ट अस्पृश्य लोकांनी जाहीर केली होती ती गोष्ट खोटी असून त्यासंबंधी आपण बाईच्या आप्तेष्टांजवळ चौकशी केली आहे. हें विधान किती असत्य आहे, हैं ज्यांस पहावयाचें असेल त्यांनीं आजच्या अंकांत दुसरीकडे खुद्द त्या बाईच्या नवऱ्याचे पत्र! छापलें आहे, तें अवश्य वाचून पहावें. सुशिक्षित म्हणविणाऱ्या माट्यांसारख्या मास्तर गृहस्थांनी असत्य गोष्टी चारचौघांपुढे बिनदिक्कत सत्य म्हणून मांडाव्यात यासारखे दुसरे निंद्य वर्तन असूं शकेल असें आम्हांस वाटत नाहीं. माट्यांच्या विरुद्ध आलेला हा पुरावा खोटा असल्यास तो खोडून टाकण्यास त्यांनीं पुढें यावयास पाहिजे होतें. पण तसें न करतां माटे मूग गिळून स्वस्थ बसले आहेत यावरून खोट्याचा वांटा कोणाच्या पदरांत येतो हें स्वधर्मकारांनी ओळखावयास पाहिजे होतें. पण तसें न करतां उलट अनेक अस्पृश्य विद्यार्थी रा. माटे यांनी तयार केलेले आहेत ते केव्हांना केव्हां बोलते होतील व डॉ. आंबेडकरांना माटे ही काय अजब चीज आहे हें दाखवून देतील, अशी दर्पोक्ति केली आहे. रा. माटे यांनी तयार केलेले अस्पृश्य विद्यार्थी कोणते व किती आहेत, याची आम्हास माहिती नाहीं. तथापि त्यांच्या कच्छपी लागलेल्या अस्पृश्य विद्यार्थ्यापैकी रा. पांडुरंग नथूजी राजभोज हे एक होते. पण त्यांनी तर रा. माट्यांची तरफदारी करण्याऐवजी माट्यांच्या खोटेपणाबद्दल त्यांच्यावर जोराचा हल्ला केलेला आहे, हैं ता. ८ मेच्या ज्ञानप्रकाशांत लिहिलेल्या त्यांच्या पत्रावरून उघड होत आहे. ईश्वर करो आणि सगळेच चेले माट्यावर न उलटोत !

स्वधर्मकार लिहितात कीं, माटे यांनी आपला जन्म अस्पृश्योद्धार करण्यांत घालविलेला आहे. असेलही. माट्यांच्या अस्पृश्योद्धारांसंबंधी लिहिण्याची पूर्वी आम्हास जरुरी वाटली नव्हती. परंतु स्वघर्मकारांनी ज्याअर्थी हा प्रश्‍न उपस्थित केला आहे त्याअर्थी त्यासंबंधी दोन शब्द लिहिणें जरूर दिसतें. अस्पृश्योद्धाराच्या कामीं आपलें आयुष्य खर्ची घालणाऱ्या सद्गृहस्थांमध्ये

पाहा, परिशिष्ट १२,