स्पृश्यांतील स्वार्थसाधु अस्पृश्यांच्या . . . . फूट पडणार नाही १७३
आमच्या माहितीप्रमाणे माट्यांचे व त्यांच्या अस्पृश्यता निवारक मंडळाचे नांव अगदी अलीकडेंच झळकूं लागलें आहे. कोणतेंहि काम करावयांचें झालें तर तें त्यांच्या अस्पृश्यतानिवारक मंडळाच्या नांवाने होत असतें. या मंडळाच्या संबंधी विशेष नवलाची गोष्ट म्हणजे ही की, या मंडळातर्फे कांही करावयांचे झालें तर ते सेक्रेटरींने ठरवावयाचें, अध्यक्षानें त्यावर सही करावयाची आणि अस्पृश्यतानिवारक मंडळाच्या नांवानें प्रसिद्ध करावयाचें । व अस्पृश्यतानिवारक मंडळाचें मत म्हणजे अस्पृश्य वर्गाचें मत असे जगाला भासवावयाचें. खरें पाहिलें असतां, या अस्पृश्यतानिवारक मंडळाला ना सभासद ना वर्गणी ! एक अध्यक्ष ; एक सेक्रेटरी, या दोन जिवांवर त्याची उडी. त्यांतहि, ज्या माट्यांच्या नांवाने स्वधर्मकार एवढी घंटा वाजवीत आहेत त्या माट्यांनी अस्पृश्यतानिवारणाप्रीत्यर्थ प्रत्यक्ष अशी कोणती गोष्ट करून दाखविली आहे, हेंही स्वधर्मकार सांगत नाहींत. का माट्यांनीं कोणा अस्पृश्याबरोबर रोटीव्यवहार करून दाखविला आहे का बेटीव्यवहार करून दाखविला आहे ? माट्यांनीं केलें आहे तरी काय, हें एकदा स्पष्ट झालें असतें म्हणजे त्यांच्याबद्दल शंकाकुशंका घेण्यास तरी कोणास कारण उरलें नसतें. आम्हांस जी माहिती उपलब्ध झाली आहे ती अशी कीं, माटे हे एवढे सोवळे गृहस्थ आहेत की, त्यांनीं आपल्या घरांतील एक खोली अस्पृश्यांच्या स्वागताकारणें निराळीच काढून ठेविली आहे. अस्पृश्यांना आपल्या घरांतील दुसऱ्या खोलींत ते कधींच घेऊन जात नाहींत, व अस्पृश्य लोक या खोलींत बसले असतांना जर एखादा स्पृश्य पाहुणा आला तर त्याला अस्पृश्य खोलींत न आणतां
आपणच बाहेर जाऊन त्यांची मुलाखत घेतात. आमची ही बातमी खोटी
असल्यास आम्हीं ती परत घेऊ. पण ती माट्यांच्या येथें जावयेव असणाऱ्या एका अस्पृश्य मित्राकडून मिळालेली आहे. सबब ती खरी असणें शक्य आहे. आम्ही आपलें माट्याविषयींचें मत जें इतक्या स्पष्टपणें मांडलें आहे याचें कारण असें कीं, आम्हांला अस्पृश्योद्धाराच्या कामीं पडणाऱ्या लोकांची निवडानिवड करावयाची आहे. व खऱ्याला जवळ करून खोट्याला घरपर्यंत पोहोंचवावयाचें आहे. माट्यांनीं अस्पृश्यतानिवारण्याचें सोंग कशाकरितां आणलें आहे, हें आम्ही एकदां विशद करून सांगितलें आहे. आमचें म्हणणें अगदींच निराधार नाहीं, हैं माट्यांनीं नुक्तिच भरवलेल्या मातंगपरिषदेची जी हकीकत t दुसरीकडे छापली आहे तिच्यावरून दिसून येईलच. अल्प बुद्धीचे लोक नेहमी परबुद्धीनें वागणारे असतातच. त्यांना हाताशीं धरून कोणीहि स्वार्थसाधु माणूस त्यांच्या समाजांत बुद्धिभेदाचें पातक करूं शकतो अशा प्रकारचा बुद्धिभेद अस्पृश्यांत दिसतो, या गोष्टीवर अवलंबून केसरीनें अस्पृश्यांत फाटाफूट झाली म्हणून आनंदाने टाळ्या
† पाहा, परिशिष्ट १३.