आपलेपणाची साक्ष दे नाहीं तर पाणी सोड - Page 219

३९
आपलेपणाची साक्ष दे नाही तर पाणी सोड

अस्पृश्य वर्गाशीं वागतांना स्पृश्य लोक किती अमानुषपणें वागतात याची एक हृदयभेदक कहाणी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. इंदोर व ग्वाल्हेर संस्थानांत बळहाई नांवाची एक अस्पृश्य जात आहे. होळीच्या सणांत या बळहाई जातींतील स्त्रियांचे डोळे बांधून त्यांची गावांतून धिंड काढण्यांत येते, व स्पृश्य लोकांकडून त्यांच्यावर घाण टाकण्यांत येते. या घाणीच्या माऱ्याने बेदम होऊन त्या बिचाऱ्या बायांनी दीनवाणीनें आम्हांला सोडा म्हणून धाय मोकलली तरी स्पृश्य लोक त्यांची सुटका न करतां ज्यास्तच घाण टाकून त्यांची मजा पहातात. या धुळवडीच्या प्रकारास “ARI असें म्हणतात. व असें करणें हा गांवकऱ्यांचा हक्क आहे, असें तिकडे मानण्यांत येतें. या बळहाई लोकांत सामाजिक जागृतीस सुरुवात झाली आहे ; त्यामुळें आपल्या स्त्रियांची होत असलेली विटंबना या लोकांस न खपून त्यांनी या वर्षी “झुंबराबिगार” झुगारून दिली. त्यामुळें स्पृश्य लोक चिडून जाऊन त्यांनी या बळहाई लोकांचा अमानुष छळ चालविला आहे. कांहीं ठिकाणी त्यांना बेदम मार देण्यांत येत आहे, त्यांचे पाणी बंद करण्यांत येत आहे, त्यांना मोलमजुरी न देण्याचा सर्वांकडून कट करण्यांत आलेला आहे. आणि कांही ठिकाणी त्यांची घरेंही जाळण्यांत आलेली आहेत. या छळामुळे हे Joely लोक इतके त्रस्त झाले आहेत कीं, त्यांना आपली कायमची वस्ति सोडून मार्ग दिसेल तिकडे निघून जाणें भाग पडलें आहे. हा

छळ जनतेतफं होत आहे असेंच नव्हे. तर त्यात वरील संस्थानातील अधिकारीहि

सामील आहेत !! असाच एक प्रकार मलबार प्रांतांत घडून आला

आहे. मलबारप्रांतांत अस्पृश्य लोकांनी फक्त पितळेचे दागिने घातले पाहिजे असा शिरस्ता आहे. गेल्या मे महिन्याच्या अखेरीस मानूर मुक्कामी अस्पृश्यांची एक सभा भरविण्यांत आली होती. त्या ठिकाणीं मलबांरांतील अस्पृश्य जातींने पितळेचे दागिने घालण्याचे सोडून देऊन सोन्याचे दागिने घालण्याचा प्रघात पाडावा असा ठराव झाला. शुभस्य शीघ्रम्‌ या न्यायाने सभा संपल्यानंतर कांहीं अस्पृश्य स्त्रियांस सभेच्या चालकांकडून पुतळ्यावजा सोन्याचे दागिने देण्यांत आले. एवढ्यावरून स्पृश्य हिंदू चिडून जाऊन त्यांनी अस्पृश्य लोकांस मोलमजुरी न देण्याचा संप केला आहे. असाच परिणाम महाडच्या परिषदेचाहि होत आहे, ही मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे. महाडच्या परिषदेत भाकर मागणें,