आपलेपणाची साक्ष दे नाहीं तर पाणी सोड - Page 221

आपलेपणाची साक्ष दे नाही तर पाणी सोड १७७

त्यांची उसनवारी बंद करावी, हिंदु मारवाड्यानें त्यांना कर्ज देऊं नये, व हिंदु

जमिनदारांनी आपल्या जमिनी त्यांच्याकडे लावूं नयेत, हा अस्पृश्योद्धाराचा प्रकार

इतिहासांत नमूद करण्यासारखा आहे. खरें म्हटलें असतां, अस्पृश्य जनता

किती तरी मूढ ! जुन्या चालीरितींच्या भूताने तिला इतक्या दिवसांपासून पछाडलें

आहे कीं, उपदेशाची धुनी किती जरी दिली तरी तिचा कांहीं उपयोग होईल किंवा

नांही, याची नेहमींच जबरदस्त शंका असते. अशा परिस्थितीत फटक्यासारखा गूण आला हें पाहून अस्पृश्योद्वारा प्रित्यर्थ झटणाऱ्या सर्व लोकांस आनंदच वाटावयास पाहिजे होता. पण तसें न होता, त्यांचा उलट चित्तक्षोभ व्हावा, यावरून येवढी गोष्ट स्पष्ट होत आहे कीं, स्पृश्य लोकांना अस्पृश्यता घालवावयाची नसून अस्पृश्यांना अस्पृश्यच ठेवावयाचें आहे. 'रहाणी सुधारल्याशिवाय आम्ही तुम्हांस घरांत घेणार नाहीं,' म्हणून सांगावयाचे आणि रहाणी सुधारण्याचा प्रयत्न करीत असतां 'पायरी सुटते' म्हणून चढत असलेल्या माणसास लाथ मारून खालीं पाडावयाचें, या निंद्य वर्तनाचा दुसरा अर्थ काय करावयाचा, हें आम्हांस कळत

नाहीं.

स्मृतिकार मनु याच्या मताप्रमाणे हिंदु समाजांतील व्यक्तिमात्रास अष्टघिकार असूं शकतात. परंतु "भगवान" मनुनें या अष्टाधिकारांची विभागणी आपल्या मर्जीनुरुप केल्यामुळें या अधिकारांपैकी बरेच ब्राह्मण वर्गांकरितां राखून ठेवले, व बाकीचे उरले ते ब्राह्मणेतरांना देऊन टाकले. अस्पृश्यांना मात्र कांहींच मिळालें नाहीं. ज्याला जसे अधिकार दिले त्याला तदनुरुप रहाणीही “भगवान“ मनूनें सांगितलेली आहे. अष्टाधिकारांपैकीं कोणतेच अधिकार अस्पृश्यांना नसल्यामुळें त्यांच्यासाठी मनूने अगदीच हलक्या प्रतीची रहाणी सांगितलेली आहे, हैं ज्या कोणी मनुस्मृतीचे । अवलोकन केलें असेल त्याला कळून येण्यासारखे आहे. अस्पृश्यांनी आपली रहाणी सुधारण्याचा प्रयत्न करणें म्हणजे अष्टाधिकारांचे धनी होऊ पहाणे असेंच होय. अर्थात्‌ स्पृश्य लोकांनी त्यांना या चढाओढींत विरोध करावा, हें अगदी साहाजिक आहे. पण हा सर्व प्रकार''भगवान” मनुच्या शिकवणीचा आहे हें निर्विवाद आहे. वरील कारणांमुळे आम्हांला प्रसंगविशेषीं नाईलाजास्तव मनुस्मृतीवर टीका करण्याची जरूर पडते. पण याबद्दल आमचे व्यवसायबंधु प्रबोधकार यांचा आमच्यावर रोष झालेला आहे. तो इतका कीं, ते आपलें पत्र आमच्या भेटीस पाठविणार नाहींत असें म्हणतात. ते म्हणतात कीं, आम्हीं शिवराळपणा करतों. त्यांनी आमच्यावर जो शिवराळपणाचा आरोप केलेला

† पाहा, परिशिष्ट क्रमांक १५.

डब्ल्यू-२०७३-१२ अ