आपलेपणाची साक्ष दे नाही तर पाणी सोड १७९
दृष्टि निवळण्याचा संभव असतो,” अशा भावनेनें प्रेरित होऊन त्यांनी आमच्या अग्रलेखावर लिहिण्याचे श्रम घेतले आहेत. या श्रमाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोंत. आम्हांला विवेकाची मात्रा पाजण्याइतकी वैद्यकी डॉ. उदगांवकरांच्या पदरीं असो कीं नसो, आम्हीं कोणाच्याहि हातून मात्रा. घेण्यास तयार आहोंत. मात्र मात्रा ही मातरा नसली म्हणजे झालें. डॉ. उदगांवकरांची मात्रा पाहूं गेलें असतां फोलकट मातराच आहे. तिच्यांत कांहीं राम दिसत नाही. आम्हीं सांगितलेल्या दंन योगापैकीं प्रतिकारयोग डॉ. उदगावकरांस पसंत आहे, हें आम्ही आमचें सुदैव समजतों. नाहींतर प्रतिकार योगाची शिकवण, हें देखील पाप आहे असे त्यांनी सांगितले तर काय घ्या | बहिष्कार योगानें मात्र डॉ. महाशयांचे पित्त खवळलें आहे. खरें म्हटले असतां, तसें व्हावयाचे कांही कारण दिसत नाहीं. उदगांवकर स्वत:च लिहितात कीं, ''डॉक्टरसाहेबांनी सात कोटी अस्पृश्य समाज आपल्या शब्दावर नाचेल अशी आशा धरूं नये.” या गोष्टीवर डॉ. उदगावकरांचा जर पक्का विश्वास असेल आणि आमचे पुढारीच नव्हत असें अस्पृश्य वर्गाच्या तोंडून म्हणवून घेण्याचा प्रसंग डॉ. आंबेडकरांवर येणार आहे, याची सुस्वप्नें जर आज उद््गांवकरांना पडत असतील तर डॉ. आंबेडकर म्हणजे एका वेडापीर आहे व त्याच्या बडबडण्यावर लक्ष न देतां त्यांना स्वस्थ बसतां आलें असतें. असो आम्ही धर्मांतर करावयास सांगितलें तर लोक आमचे पुढारीपण काढून घेतील, असें भय दाखवून जर आम्हांस स्तब्ध बसविण्याचा डॉ. उदगांवकरांचा इरादा असेल तर डॉ. उदगांवकरांना आमच्या स्वभावाची
ओळख पटल नाहीं असेंच म्हटलें पाहिजे. सात कोटी अस्पृश्य आमच्या शब्दावर
नाचतील, असे आम्हीं केव्हांच मानलें नव्हतें. पण तेवढ्यावरून आम्हांस जें
सांगावयाचें किंवा करावयाचें तें सांगितल्याशिवाय किंवा केल्याशिवाय आम्ही कदापि राहणार नाही! आम्ही स्वतःला पुढारी म्हणून समजत नाहीं. आणि लोक
समजत असले तर अनुयायांनी पाऊल टाकलें किंवा नाहीं. याची वाट पहात उभें
राहणाऱ्या पुढाऱ्यांपैकीं भेकड पुढारी आम्ही नव्हत. हें डॉ. उदगावकरांनी ध्यानांत ठेवावें. तसेंच आमच्यांत व आमच्या अस्पृश्य बंधूंत मतभेद होऊन आमचें पुढारीपण जरी नष्ट झालें तरी त्यांचें आम्हांस लवमात्रहि वाईट वाटणार नाहीं. कारण सवंग लोकप्रियता मिळविण्याकरितां लोकांना जें रुचेल तेंच सांगावें, अशा प्रकारचें दांभिकपणाचें आमचें धोरण नसून आपल्याला जें खरें वाटतें तेंच बोलावें हे आमचें प्रामाणिक मत आहे. असो. बहिष्कार योग हा उपाय लो. टिळकांचा आहे, असें आम्हीं म्हटलें, त्याबद्दल डॉ. महाशयांस तर मोठेंच हंसें कोसळलें आहे. आमची खात्री आहे कीं, डॉ. महाशयांना आमचें लिहिणे कळण्याइतकी बुद्धिमता असती तर हंसूं येण्याऐवजी त्यांना WS कोसळले असतें ;