आतां हातीं लेखणी धरिली तरी आयुष्यांत तरवार व बंदूक धरिली नाही असे नाहीं. - Page 225

४०

आतां हाती लेखणी धरिली तरी आयुष्यांत तरवार
क बंदूक धरिली नाही असे नाहीं

ही वेळ परीक्षेची आहे. म्हणूनच स्पृश्य लोकांपैकी ज्या कोणास अस्पृश्यता निवारणाच्या बाबतींत काहीं बोलावयाचे असेल तर कृतीच्या बाहेर त्यांनी आपल्या शब्दांची मजल जाऊं देऊ नये. हें बरें नाही तर मुंबईत नुकतेच फणसवाडींत स्थापन झालेल्या देवालयाच्या चालकांची जशी परीक्षा घेण्यांत आली तशींच इतरांचीही घेण्यात येईल. पुण्याच्या लोकांना देवळें बांधण्याची मोठी हौस आहे असें म्हणतात. पण त्याला कांही तरी कारण आहे. असें सांगतात कीं, पुण्यांतील लोकांस इतर शहरांतील लोकापेक्षां लघुशंकेचें व्यसन मोठे दांडगे आहे ;

व त्याच्या निरसनार्थ जागोजाग जशी व्यवस्था असावयास पाहिजे होती तशी

पुर्वीच्याकाळीं नसल्यामुळें लघुशंकेनें पीडीत झालेले लोक कोठें तरी पोट मोकळें करीत असत. त्यामुळें आसपासच्या घरवाल्यांस या घाणीपासून पुष्कळ त्रास होत असे. आपल्या घराशेजारीं अशी कोणी घाण करुं नये म्हणून बिचाऱ्या घरवाल्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ते सारे निष्फळ झाले. अशा विवंचनेत असतांना कोणा एका घरवाल्याला अशी कल्पना सुचली कीं, ज्या गल्लीत लोक लघुशंका करतात त्या गल्लींत जर देवळें बांधण्यांत आलीं तर असल्या घाणीपासून

आपली सुटका होईल. कारण देवळासारख्या पवित्र जागेनजीक असला

घाणेरडा प्रकार करण्यास कोणास उचित वाटत नाहीं. ताबडतोब ही कल्पना साऱ्या पुण्याभर पसरली, आणि कोठें “ कचकाऊन म्हसोबा “ तर कोठें सोट्या म्हसोबा “ कोठें '' खुन्या मुरलीधर “ तर कोठें चिमण्यागणपती, कोठें बटाट्या मारुती तर कोठें भांग्या मारुती वगैरे वगैरे अनन्वित नावांच्या देवांची देवळें झालीं. पुण्याचें कसेंहि असो पण अशी आपत्ति कांहीं मुंबईच्या लोकांवर

कोसळली नव्हती. यास्तव दहा लक्ष रुपये खर्च करुन हें नवे देऊळ कशाकरिंतां

बांधण्यांत आलें, व त्यास “ प्रतिवादी भयंकर मठ “ हें भेसूर नांव कां देण्यांत आलें हा कांही थोड्या लोकांपुरता कां होईना वादाचा प्रश्‍न होऊन राहिला होता. त्यांतल्यात्यांत हें देवालय सर्व हिंदू लोकांस Got ठेवण्यांत येणार आहे, असे मुंबईतील “ हिंदुस्तान “ पत्राच्या ता. १० जूनच्या अंकांत प्रसिद्ध झालें होतें. मठांतील अस्पृश्यता निराकारणप्रिय लोकांनी ही बातमी डॉ. आंबेडकरांच्या