आतां हातीं लेखणी धरिली तरी आयुष्यांत तरवार व बंदूक धरिली नाही असे नाहीं. - Page 226

१८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

निदर्शनास आणून दिली. तेव्हां, ही गोष्ट कसाला लावावी, व त्यासाठी मठाच्या अधिपतीची भेंट घ्यावी असे ठरलें. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर यांनी मठाधिपतीस भेटावयास केव्हां यावें, याबद्दल विचारपूस केली. व रविवार ता. १२ जून १९२७ रोजी संध्यांकाळीं ६ वाजतां आल्यास भेट होईल, असा टेलिफोनवरुन निरोप आला. त्याप्रमाणे डॉ. आंबेडकर, रा. शिवतरकर यांच्यासह, सदरहू देवळांत गेले. मठाधिपतीची भेंट कशी होईल, याची चौकशी करीत असतां ओळखीच्या कोणी एका उपङ्खयाप्यानें देवळांतील एका पंड्याचे कान फुंकले. त्याबरोबर “ अस्पृश्य लोक देवळांत शिरले ! " अस्पृश्य लोक देवळांत शिरले । “ असा एकच हलकल्लोळ उडाला. व डॉ. आंबेडकर व रा. शिवतरकर यांच्यावर जमलेल्या लोकांनी एकच गिल्ला केला. “ आम्ही आमंत्रणानें आलों आहोंत, तुम्हांला काय करावयांचे असेल तें करा ! आम्ही हटणार नाहीं ! ” असें रोखठोक सांगून जर या प्रसंगाला धीराने तोंड देण्यांत आलें नसतें, किंवा किंचित भित्रेपणा दाखविण्यांत आला असता तर हें प्रकरण हातघाईवर येऊन त्याचें पर्यवसान मारामारींत झाले असतें. तथापि ज्या सद्गृहस्थांनीं वृत्तपत्री प्रसिद्ध झालेली माहिती डॉ. आंबेडकरांच्या निदर्शनास आणली होती ते गृहस्थ अचानक तेथें आल्यामुळें गर्दीतील कांहीं लोकांनीं त्यांच्यावर हात टाकला ! इतक्यात मठाधिपतीच्या सेक्रेटरीस ही गोष्ट कोणीशी जाऊन कळविल्यावर ते तेथें आले

व त्यांनीं गोंगाट थांबविला ; व “ मठाधिपतीची व आपली पुनः केव्हांतरी भेट करून

देऊं. “ असें सांगून डॉ. आंबेडकरांना परतून लाविलें. आम्ही आपला पत्ता त्यांना दिला होता, व त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात आहोंत. कांहीं मुदतीत जर आम्हाला उत्तर आलें नाहीं तर या बाबतींत अस्पृश्यांचे हक्क संरक्षित करण्याकरितां जी उपाययोजना सुचेल ती आम्ही अमलांत आणूं. या बोलघेवड्या लोकांचा असा पिच्छा पुरविल्याशिवाय तें बोलाप्रमाणे कृति करण्यास कदापि सिद्ध होणार नाहींत.

मुंबईतील अस्पृश्य लोकांस आपला देवळांत प्रवेश करून देण्यास ही उत्तम संधी सांपडली आहे. तिचा उपयोग करून घेण्यास त्यांनीं सिद्ध व्हावें अशी आमची त्यांस आग्रहाची सूचना आहे. त्या सूचनेचा ते पूर्ण विचार करतील अशी आम्हाला आशा आहे. मुंबईतील जे कांहीं अस्पृश्य लोक निराळें देऊळ बांधण्याचा उपक्रम करीत आहेत, त्यांना आमचें या बाबतींतील काय मत आहे, हें आम्हीं सांगून टाकलेंच आहे. त्यांपैकीं जे कांहीं म्होरके आहेत त्यांनीं आमच्या म्हणण्याचा पूर्णपणें विचार केल्याशिवाय आम्ही अस्पृश्य लोकांस धर्मान्तर करण्यास सांगतों, याचा आधार घेऊन आमच्या धोरणास “ भागुभाई “ हें विशेषण लाविलें आहे. आमच्या बापजाद्यांनीं शिपाईगिरीच केली. तरवार व बंदूक