आतां हातीं लेखणी धरिली तरी आयुष्यांत तरवार व बंदूक धरिली नाही असे नाहीं. - Page 227

आतां हातीं लेखणी धरिली . . . . बंदूक धरिली नाही असे नाहीं १८३

याखेरीज दुसऱ्या कशास हात लावला नाही, हें कोणासही सांगावयास नको. आम्ही आतां जरी हातीं लेखणी धरिली आहे, तरी सुद्धां आपल्या आयुष्यांत तरवार व बंदूक केव्हांच हाती धरिली नाहीं असें नाहीं. ज्यांच्या बापजाद्यांनीं कोयतासुद्धा हातीं धरिला नाहीं त्यांच्या शूरत्वाच्या वल्गना एखाद्या पेद्रुच्या वल्गनेप्रमाणेंच निरर्थक समजल्या जातील. पण वादाच्या या आनुवंशिक बाजूकडे दुर्लक्ष केलें तरी खरें शौर्य कशांत आहे ? निराळें देऊळ बांधण्यांत काय ? याला जर शौर्य म्हणतां येईल तर “ जी, तुमच्या जोड्यांत राहणारा मी, वर कसा येऊ ? इथेंच बसतों. “ असें म्हणणाऱ्या जुन्या मुर्दाड लोकांना पराक्रमी वीर म्हणावें लागेल ! निरनिराळ्या देवळाची भीक ताज्या दमाचा, नव्या रक्‍ताचा अस्पृश्य कधींच मागणार नाहीं. तो आज ना उद्यां देवळांत जाईल. पण भागुबाईला तिचें काय होय? तिचें बिचारीचें निराळ्या देवळाशिवाय कसें चालणार ? अशा लोकांना आमचें म्हणणें मान्य नसेल तर त्यांनीं निराळें देऊळ बांधावे, पण मग आम्हा अस्पृश्यांचे नांव सांगूं नये.

०००
ता NE लत ERP AS MPR I

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.