४२
हिंदुंच्या शारिरीक ऱ्हासाचे कारण
हिंदुस्थान देशाचा ऱ्हास झाला तो सर्वच परी झाला. त्यांतल्या त्यांत हिंदु लोकांचा जो शारिरीक ऱ्हास झाला तसा र्हास कोणत्याच बाबतींत झाला नाहीं असें आमचें मत आहे. मुंबई येथील ओरिएन्टल विमा क॑पनीनें या विषयावर नुकतेच एक लहानसें पण माहितीपूर्ण पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. त्यांत हिंदू लोकांची शरीरयष्टि युरोपियन लोकांच्या मानानें किती कमी दर्जाची आहे हें पुराव्यानिशी सिद्ध करून दिलें आहे. फार दिवस होत असलेला हा शारिरीक ऱ्हास या पुढें कसा टळेल, या प्रश्नाकडे देशहितेच्छु लोकांचे लक्ष जावें हे साहजिकच आहे. यास्तव, ज्या सद्गृहस्थांनीं गेल्या मे महिन्यांत पुणें येथे महाराष्ट्र शारिरीक परिषद भरवून आणली त्यांचे आभार मानणें अत्यंत आवश्यक आहे. तथापि, एका गोष्टीबद्दल खेद व्यक्त करणें आम्हांस जरूर वाटतें. सदरहू परिषदेत एकदंर ६ ठराव पास करण्यांत आले. पास झालेले ठराव उपयुक्त आहेत, याबद्दल संशय नाहीं. पंरतु सभेंत बालविवाहनिषेधप्रदर्शक ठराव पास करण्यांत आला नाहीं. याचें आम्हास नवल वाटतें. शारिरीक ऱ्हासाची अनेक कारणें असूं शकतील. पण आम्हास असें वाटतें कीं, बालविवाह हें हिंदूलोकांच्या शारिरीक ऱहासाचें एक महत्त्वाचें कारण आहे. सन १८७१ सालीं बाबू केशव चंद्रसेन यांनीं हिंदूंचा शारिरीक हास कां झाला ? वतो कशानें थोपेल ? या विषयासंबंधी अनेक नामांकित डॉक्टर लोकांचीं मतें मागविलीं होतीं. त्यांत सर्व डॉक्टर लोकांनी एकच निर्णय दिला. तो हा कीं शारिरीक -हासाचा अनर्थ एका बालविवाहाच्या पद्धतीमुळे ओढवला आहे ; व तो टाळण्यास मुलीचें लग्न सोळा वर्षाच्या आंत होऊ नये असेच जवळ जवळ सर्वांचे मत पडलें. जोर काढून किंवा कसरत करून मनुष्य शरीर कमवूं शकेल. पण मुळीं शरीरांतच जर कस नसेल तर कमाई कसली होणार ? या दृष्टीनें पहातां, परिषदेंचें कार्य अपुरें झालें असें म्हणावें लागतें. आतां, विवाहाची वयोमर्यादा ठरविणें हा धार्मिक प्रश्न आहे असें मानलें गेलें असल्यामुळे आपण त्यांत हात घालूं नये असें परिषदेच्या चालकांस वाटून त्यांनीं हा महत्वाचा प्रश्न सोडून दिला असावा, आणि तसेंच जर असेल तर परिषदेच्या योगानें हिंदु जनाचें शारीरिक बलसंवर्धन होईल, अशी आशा करणें व्यर्थ आहे. हिंदु लोकांत धर्माची भावना इतक्या भयंकर प्रमाणांत पसरली गेली