१८६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे कीं, वाटेल ती गोष्ट धर्माच्या सदरांत आणण्यास कोणासहि कष्ट पडत नाहींत. आणि धार्मिक गोष्टींत हात घालावयाचा नाहीं, या सबबीवर कोणत्याच प्रकारची सुधारणा करणें जड जातें. अशा परिस्थितींत धर्माला योग्य ती मर्यादा घालून समाजसुधारणेचे कार्य सुलभ करणें हें प्रत्येक सुधारणावाद्याचें आद्य कर्तव्य आहे. तें कर्तव्य पार पाडण्यास ज्यांच्या अंगांत धैर्य नाहीं, त्यांच्या हातून सुधारणा घडून येतील, असें आम्हांस मुळींच वाटत नाहीं. आमच्या या सूचनेचा शारीरिक परिषद पुढील खेपेस विचार करील, अशी आम्हास उमेद आहे.
e९6९
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत, ता. १ जुलै १९२७.