दु:खांत सुख - Page 231

४३
दु:खांत सुख

जगांत अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्मांतील अनुयायांत नानाप्रकारचे भेद दिसून येतात. कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी ज्ञानी तर कोणी अज्ञानी हे सामान्य भेद सर्व धर्मांत आहेत. त्याचप्रमाणें कांहीं व्यवसायपरत्वें पडलेले विशिष्ट भेदही एकाच धर्मांतील अनुयायांत दिसून येतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, हे भेद हिंदु धर्मातच आहेत असें नाहीं. ते खिश्चन व मुसलमान धर्मातही दिसून येतात. वरील सामान्य तसेंच विशिष्ट प्रकारचे भेद सर्वत्र सारखे असल्यामुळें हिंदु समाजांत पडूं पाहणारे तट इतर समाजांत पडलेल्या तटांसारखेच असतील, असा साधारणपणे समज होणें अगदीं शक्‍य आहे. तरी पण हिंदुसमाजात आज जो ब्राह्मण-ब्राह्मणेतर तट कितीएक दिवसांपासून पडला आहे, तो तट कांहीं अंशीं अगदीं अपूर्वसा आहे ; इतका कीं, त्याला अन्यत्र साम्य सांपडणे कठीण आहे. यूरोपांत ज्या अनेक चळवळी झाल्या त्यांच्या नांवांत राजा-राजेतर, पोप-पोपेतर, श्रीमंत-श्रीमंतेतर असा फरक जरी केला तरी अशा नामांतरापासून ब्राह्मणेतर चळवळीचे रहस्य Hol, सुलभ होईल असें आम्हांस वाटत नाहीं. याचे कारण असें कीं, ज्या भेदावर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची उभारणी झाली आहे तो भेद इतर धर्मात नसून फक्त हिंदुधर्मातच काय तो आहे. तो भेद हा कीं, इतर धर्मातील अनुयायांत जे भेद दिसून येतात ते गुणभेद विभागशः या तत्वाच्या पोटीं उत्पन्न झालेले आहेत. त्याच तत्वावरून साहजिकपणें पडणाऱ्या उभ्या भेदाच्या तटबंद्या हिंदुसमाजात आहेतच. पण त्याशिवाय जन्मजाति विभागशः या तत्वानुरूप पडणाऱ्या आडव्या भेदाच्या ज्या अनेक तटबंद्या हिंदुसमाजांत दिसतात त्या दुसऱ्या कोणत्याच समाजांत दिसत नाहींत. या दुहेरी विभागणीनुसार गुणभेदाच्या उभ्या तटबंदीमुळेच एकाच वर्गात येणारे लोक जातिभेदाच्या आडव्या तटबंदीमुळे पृथक्‌ पृथक्‌ होऊन बसले आहेत. दृष्टांताच्या रूपाने सांगावयाचें झाल्यास असें सांगता येईल कीं, धनभेदानुरूप वर्गीकरण केलें तर श्रीमंत व गरीब असा गुणभेद सर्व समाजांत होऊ शकतो. पण इतर समाजांत जशी येथे या भेदाची मर्यादा संपते तशी ती हिंदुसमाजांत संपत नाही. हिंदुसमाजांत या भेदाला आणखी पुढे एक WE शिल्लक राहतें ; व श्रीमंत ब्राह्मण व श्रीमंत महार, ब्राह्मण मजूर व महार मजूर असा जसा दुसरा भेदभाव करतां येतो तसा भेदभाव, करावयास अन्यत्र कोठेंच