१८८ डाँ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वाव सापडत नाहीं. अन्य समाजातील वर्गवारी एकेरी तत्वावर आली असल्याकारणांने तेथील सामाजिक चळवळींचा रोख उभे भेद नष्ट करण्याकडे असतो. परंतु ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीचे तसें नाहीं. तिचा सारा मारा हिंदु समाजातील आडव्या भेदाच्या तटबंदीवर आहे.
हिंदु समाजांत या आडव्या तटबंद्या कधीं व कशा पडल्या याचा उहापोह आज आम्हांस करावयाचा नाहीं. आज इतकेंच सांगितले म्हणजे बस्स आहे कीं, ऋग्वेद काळानंतर जेव्हा ब्रह्मदेव बाळंत झाला तेव्हांच ब्राह्मण जातिवाचक Hct
PRA जन्मास आलीं ; व त्यांनीं आपल्याभोंवती प्रथमतः तटबंदी केली. ही
तटबंदी झाल्याबरोबर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा भेदभाव जन्मास आला व गुणभेद विभागशः हें तत्त्व अजिबाद गाडलें जाऊन त्याच्याऐवजीं जातिभेद विभागशः हैं तत्त्व प्रस्थापित करण्यांत आलें. पुढें कालानुसार ब्राह्मण जातीसाठी जसा ब्रह्मदेव बाळंत झाला तसा ब्राह्मणेतरांतहि जे अनेक वर्गभेद होते, त्या वर्गानीं कोणा ना कोणास बाळंतपणाच्या वेदना सहन करावयास लावून आपण अमूक एका ऋषीपासून उत्पन्न झालों, असें मानून इतर वर्गापासून भिन्न आहोंत, अशी भावना दृढमूल करून घेतली व ब्राह्मणवर्गाप्रमाणे दरेक ait आपल्याभोंवतीं तट बांधण्याच्या कामास सुरवात केली. या तटबंदीचा मूळ हेतु इतरांपासून आपण अलग आहोंत, एवढे दर्शविण्यापुरताच असता तरी बरें झालें असतें. परंतु ज्या ब्राह्मणवर्गानें प्रथमतः तटबंदी करण्यास सुरवात केली त्या ब्राह्मणवर्गाचा तटबंदी करण्याचा मुख्य हेतु इतरापेक्षां आपण श्रेष्ठ आहोंत हें दाखविण्याचा होता, हें निर्विवाद आहे. ब्राह्मणेतर लोकांत समाविष्ट होणाऱ्या वर्गानीं जेव्हां या तटबंदीच्या पद्धतीचें अनुकरण केलें तेव्हां त्यांत अंतर्भूत झालेल्या श्रेष्ठ कनिष्ट भावनेचेंहि सहजगत्या त्यांच्याकडून अनुकरण झालें. या तटबंदीमुळें हिंदु समाजात सर्वत्र अशी भावना पसरली कीं, दरेक जातीस आपण दुसऱ्या जातींपासून अगदी भिन्न आहोंत, इतकेच नव्हे तर कोणत्या ना कोणत्या इतर जातींपेक्षां आपली जात श्रेष्ठ आहे, या भावनेनें साऱ्या जाती अगदीं पिडून गेलेल्या दिसतात. ब्राह्मण्याची व्याख्या कोणी कशीहि करो. जन्मजात उच्चनीच भाव हीच ब्राह्मण्याची खरी व्याख्या आहें असें आम्हांस वाटतें व तशाच अर्थी या शब्दाचा आम्हीं उपयोग करणार आहोंत.
ब्राह्मण्याचा उगम झाल्यापासून ब्राह्मणेतर जनतेने त्याच्याविरुद्ध झगडा मांडला होता हैं ज्यांनीं प्राचीन इतिहासाचें अवलोकन केलें असेल त्यांना सहज कळून येण्यासारखे आहे. परंतु, हल्लींच्या काळीं या वादाला जितकें निकराचें स्वरूप आलें आहे, तितकें यापूर्वी केव्हाच आलेले नव्हते. पूर्वीच्या काळी हिंदु